Jump to content

होसीन सोलतानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
मुष्टियुद्ध (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
सुवर्ण १९९६ अटलांटा ६० किलो
कांस्य १९९२ बार्सिलोना ५७ किलो

होसीन सोलतानी (जन्म:२७ डिसेंबर, १९७२;थेनिया, अल्जीरिया — मृत्यू:मार्च, २००२;मार्सेल, फ्रान्स) हा एक अल्जीरियन मुष्टियोद्धा होता. याने दोनवेळेस ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले. याने १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत लाइटवेट वजनगटात सुवर्णपदक जिंकले होते. सोलतानीने १९९२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत फेदरववेट वजनगटात कांस्यपदक जिंकले होते.


इ.स. २००२ मध्ये होसीन संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. दोन वर्षानंतर होसीनचा मृतदेह मार्सेल येथे मिळाला. होसीनचा अपहरण करून खून करण्यात आला होता.