अनुभव (चित्रपट)
Appearance
1971 film by Basu Bhattacharya | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
मालिका |
| ||
| |||
अनुभव हा प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा १९७१ चा हिंदी भाषेतील चित्रपट असून त्यात संजीव कुमार, तनुजा आणि दिनेश ठाकूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बासू बट्टाचार्य यांच्या शहरी वातावरणातील वैवाहिक मतभेदावरील आत्मनिरीक्षण या विषयावरील तीन चित्रपटांमधील पहिला भाग होता, ज्यात अविष्कार (१९७३) आणि गृह प्रवेश (१९७९) हे होते. ह्या चित्रपटाला १९७२ चा द्वितीय सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि नंतर मुख्य प्रवाहातील सिनेमाने देखील हा विषय उचलला.[१] पार्श्वगायिका गीता दत्त यांच्या गुलजारच्या गाण्यांसह संगीत दिग्दर्शक कनू रॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या "मेरी जान मुझे जान ना कहो", "कोई चुपके से आके" आणि "मेरा दिल जो मेरा होता" यासारख्या उत्कृष्ट गाण्यांसाठीही हा चित्रपट लक्षात ठेवला जातो.[२]
पात्र
[संपादन]- संजीव कुमार - अमर सेन
- तनुजा - मीता सेन
- दिनेश ठाकूर - शशी भूषण
- ए.के. हंगल - हरी
- ओम प्रकाश कोहली - डॉ. कोहली
पडद्यामागे
[संपादन]- दिग्दर्शक - बासू भट्टाचार्य
- पटकथा - बासू भट्टाचार्य
- संवाद - कपिल कुमार, सागर सरहदी
- निर्माता - बासू भट्टाचार्य
- संपादक - एस. चक्रवर्ती, सखाराम बोरसे (सहाय्यक)
- सिनेमॅटोग्राफर - नंदो भट्टाचार्य
- कला सजावट - रिंकी भट्टाचार्य, अतुल (सहाय्यक)
- उत्पादन व्यवस्थापक - एम. वेणुगोपाल
- सहाय्यक दिग्दर्शक - माणिक चटर्जी, धनलाल, ललित राय
- सहाय्यक कॅमेरामन - रणदेव भादुरी, धोंडू, विजय हंगल (स्टिल्स)
- संगीत दिग्दर्शक - कनू रॉय
- गीतकार - गुलजार
- पार्श्वगायक - मन्ना डे, गीता दत्त, सुबीर सेन
पुरस्कार
[संपादन]- १९७२- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी
- १९७३ - फिल्मफेर विशेष पुरस्कार, बासू भट्टाचार्य यांच्यासाठी विशेष प्रमाणपत्र
संदर्भ
[संपादन]- ^ Gulzar; Nihalani, Govind; Chatterjee, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi cinema. (Encyclopædia Britannica (India) Pvt. Ltd), Popular Prakashan. p. 87. ISBN 81-7991-066-0.
- ^ "All Time Greats: Geeta Dutt: Too short a lifespan for a nightingale". The Daily Star. 30 June 2005.