Jump to content

वर्ग चर्चा:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकीपीडियावर सध्या “साहित्य अकादमी पुरस्कारविजेते” आणि “साहित्य अकादमी पुरस्कार विजेते” असे दोन वर्ग तयार झाले आहेत. असे असू नये. माझ्या मते “साहित्य अकादमी पुरस्कार विजेते” असे लिहीणे योग्य आहे. पण जुन्या “साहित्य अकादमी पुरस्कारविजेते” वर्गाच सदुसष्ठ नोंदी असल्यामुळे त्या वर्गाचे नाव बदलणे जरा कटकटीचे आहे. कोणाला वेळ असल्यास हा बदल करता येईल का?

Mitoderohne (चर्चा) १६:२३, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

@J:
नमस्कार,
पूर्वी सदस्य J यांनी विषद केल्याप्रमाणे पुरस्कारविजेते असा सामासिक शब्द अधिक बरोबर आहे. तरीसुद्धा तसे नसल्यास मी सांगकाम्या (Bot) चालवून हे बदलू शकतो.
एकदा कोणता वर्ग बरोबर हे ठरले की मी सांगकाम्या चालवेन.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २३:०५, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
J यांचा संदेश -
पुरस्कारविजेते हा सामासिक शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबरच आहे. तरी हल्ली हल्ली जोडशब्द फार मोठा(!) होतो आहे असे वाटले तर समास सोडवून लिहिण्याची प्रथा सुरू झाली आहे. उदा० अनाथविद्यार्थिगृह असे न लिहिता अनाथ विद्यार्थी गृह असे लिहितात.(विद्यार्थी अनाथ, की गृह अनाथ हा प्रश्न विचारू नये!) कृषिमहाविद्यालय/विधिमहाविद्यालय ऐवजी कृषी महाविद्यालय./विधी महाविद्यालय, वगैरे. त्या प्रथेनुसार ’पुरस्कार विजेते’ असा दोनशब्दी मथळा लिहायला हरकत नसावी.....J (चर्चा) २३:४६, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)
वरील लक्षात घेता साहित्य अकादमी पुरस्कारविजेते या वर्गातील लेख साहित्य अकादमी पुरस्कार विजेते या वर्गात स्थानांतरीत करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २३:५१, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

फार छान.

Mitoderohne (चर्चा) १५:२९, १९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]