Jump to content

कॅरोल (गीतप्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅरोलएक पश्चिमी गीतप्रकार. नाताळच्या सणात ही आनंद-गीते गातात. मध्ययुगीन फ्रान्समध्ये कॅरोल हे एका नृत्यप्रकाराचे नाव होते तथापि या नृत्याची गीतेच पुढे त्या नावाने ओळखली जाऊ लागली

यूरोपमधील निरनिराळ्या देशांतही ती लोकप्रिय झाली. कालौघात या गीतांचे स्वरूप धार्मिक आशयापुरतेच सीमित झाले.

त्यांची रचना नेहमीच साधी आणि गेय असते. आज मुख्यतः नाताळमध्ये म्हटल्या जाणाऱ्या आनंदगीतांनाचा कॅरोल म्हटले जाते.

कित्येक आनंदगीते केवळ परंपरेनेच पुढील पिढ्यांना मिळालेली असून त्यांचे कवी अज्ञात आहेत.