क्वेन्झाने वॉलिस
American actress (born 2003) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Quvenzhané Wallis |
---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट २८, इ.स. २००३ Houma |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
व्यवसाय |
|
कार्यक्षेत्र |
|
मातृभाषा | |
क्वेन्झाने वॉलिस (जन्म २८ ऑगस्ट २००३)[१] [२] [३] एक अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका आहे. २०१२ मध्ये, तिने बीस्ट ऑफ द सदर्न वाइल्ड (२०१२) या नाट्य चित्रपटात हशपपी म्हणून काम केले, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. ती या श्रेणीत नामांकन मिळालेली सर्वात तरुण अभिनेत्री, तसेच ऑस्करसाठी नामांकन मिळवणारी २१ व्या शतकात जन्मलेली ती पहिली व्यक्ती ठरली.[४][५] ती स्टीव्ह मॅक्वीनच्या चित्रपट १२ इयर्स अ स्लेव्ह (२०१३) मध्ये दिसली होती. वॉलिसने ॲनीच्या २०१४ च्या रुपांतरात ॲनी बेनेटची भूमिका केली, ज्यासाठी तिला मोशन पिक्चर - कॉमेडी किंवा म्युझिकलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब नामांकन मिळाले होते.[६]
वॉलिस ही ॲनिमेटेड चित्रपट ट्रोल्स (२०१६) मधील हार्पर या पात्राला आवाज देण्यासाठी देखील ओळखले जाते; तसेच दूरचित्रवाणी सिटकॉम ब्लॅक-इश (२०१९) मध्ये कायराची तिची भूमिका नावाजली आहे.
एक लेखिका म्हणून तिने चार मुलांची पुस्तके प्रकाशित केली आहेत: शाई अँड एमी स्टार इन ब्रेक एन एग!, अ नाईट आउट विथ ममा, शाई अँड एमी स्टार इन डॅन्सी पँटस! आणि शाई अँड एमी स्टार टू द रेस्क्यू![७]
वॉलिसचा जन्म हौमा, लुईझियाना येथे क्लिंड्रिया वॉलिस (शिक्षिका) आणि वेन्जी वॉलिस सीनियर (ट्रक चालक) यांच्या घरी झाला.[८] तिला एक बहीण (क्युनिक्वेक्य) आणि दोन भाऊ (वेजोन आणि वेन्जी जूनियर) आहे.[२][९][१०]
कारकीर्द
[संपादन]वयाच्या पाचव्या वर्षी, वॅलिसने बीस्ट्स ऑफ द सदर्न वाइल्ड (२०१२) साठी ऑडिशन देण्यासाठी तिच्या वयाबद्दल खोटं सांगीतले ज्यासाठी किमान वय ६ वर्षे होते. लुईझियानाच्या बॅकवूड्स बेउ स्क्वॉलरमध्ये तिच्या मरणाला टेकलेल्या वडिलांसोबत राहणाऱ्या हशपपी चे पाट्र साकारण्यासाठी ४,००० कलाकारांपैकी तिची निवड करण्यात आली होती.[११] दिग्दर्शक बेन्ह झेटलिन यांनी द डेली बीस्टला सांगितले की जेव्हा त्यांनी वॉलिसचा अभिनय बघितला, तेव्हा त्यांना लगेच जाणवले की त्याची शोधमोहीम संपली आहे. तिच्या दृढ इच्छाशक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला सामावून घेण्यासाठी बीस्ट्स ऑफ सदर्न वाइल्ड च्या पटकथेत बदल करण्यात आले. तिचे वाचन पराक्रम, मोठा किंचाळणारा आवाज आणि हुकूम ऐकण्याची क्षमता याने दिग्दर्शकाला प्रभावित केले आणि तिने हा भाग जिंकला.[१०][१२]
१० जानेवारी २०१३ रोजी, वयाच्या नवव्या वर्षी, वॉलिसला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. वॉलिस, जेव्हा तिने बीस्ट्स ऑफ द सदर्न वाइल्ड चित्रित केले तेव्हा ६ वर्षांची होती, ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी सर्वात तरुण नामांकित आणि कोणत्याही श्रेणीतील तिसरी-तरुण नामांकित व्यक्ती आहे. वॉलिस ही पहिली आफ्रिकन-अमेरिकन बाल-अभिनेता आहे आणि ऑस्कर नामांकन मिळवणारा २१ व्या शतकात जन्मलेली पहिली व्यक्ती आहे.[१३][१४]
नंतर २०१३ मध्ये १२ इयर्स अ स्लेव्ह या चित्रपटात वॉलिसची भूमिका होती. २०१४ मध्ये, तिने ॲनीमध्ये शीर्षक पात्र साकारले व असे करणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री ठरली.[१५] यासाठी, तिला मोशन पिक्चर - कॉमेडी किंवा म्युझिकलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. मे २०१४ मध्ये, वॉलिस ही ज्योर्जिओ अरमानीच्या किशोरवयीन मुलांसाठीच्या फॅशन व्यवसायाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पहिली बाल कलाकार बनली.[१६]
वॉलिस "ऑल नाईट" साठी बियॉन्सेच्या २०१६ च्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. [१७]ऑक्टोबर २०१७ मध्ये, तिने दोन मुलांची पुस्तके प्रकाशित केली: शाई अँड एमी स्टार इन ब्रेक एन एग! आणि ए नाईट आउट विथ ममा. हे पुस्तक तिच्या आईसोबत ऑस्कर पुसस्कारांच्या रात्रीच्या वेळीचे आहे.[१८][१९] २०१८ मध्ये तिने "शाई अँड एमी स्टार" मालिकेतील आणखी दोन पुस्तके प्रकाशित केली.[७][२०]
संदर्भ
[संपादन]- ^ "11 Celeb Names You're Totally Pronouncing Wrong". Seventeen. 2017-07-31. 2017-11-19 रोजी पाहिले.
- ^ a b "Beasts of the Southern Wild press kit" (PDF). March 8, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. December 30, 2012 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Monitor". Entertainment Weekly (1274). Aug 30, 2013. p. 20.
- ^ Blakely, Rhys (January 10, 2013). "Youngest v oldest actress vie for Oscar as Lincoln leads the pack". The Times. 2013-01-10 रोजी पाहिले.
- ^ Walker, Tim (January 10, 2013). "Quvenzhané Wallis v Emmanuelle Riva: Best actress Oscar contested by oldest and youngest ever nominees". The Independent. 2013-01-10 रोजी पाहिले.
- ^ Nicholson, Amy (June 29, 2012). "Quvenzhané Conquers Hollywood: 20 Questions for the 8-year-old star of Beasts of the Southern Wild;)". Boxoffice.com. April 19, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-14 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ a b A Shai & Emmie Story. 2019-12-27 रोजी पाहिले.
- ^ The Deadline Team (November 24, 2012). "OSCARS Interview: Quvenzhané Wallis". Deadline. November 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ McKnight, Laura (May 13, 2010). "Houma girl to star in independent film". 2013-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-14 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ a b Ebert, Roger (June 22, 2012). "Quvenzhané. A small force of nature". Roger Ebert's Journal. 2013-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-14 रोजी पाहिले.
- ^ Truitt, Brian (June 26, 2012). "Quvenzhane Wallis makes 'Southern Wild' sing". USA Today. June 26, 2012 रोजी पाहिले.
- ^ Haramis, Nicholas (3 December 2014). "There's Something About Quvenzhané Wallis". The New York Times Company. 2014-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 December 2014 रोजी पाहिले. Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ Day, Patrick Kevin (January 10, 2013). "Oscar nominations: Quvenzhane Wallis is young but not youngest ever". Los Angeles Times.
- ^ Alexander, Bryan (January 10, 2013). "History-making Quvenzhane Wallis: 'This is special'". USA Today.
- ^ Rottenberg, Josh (February 24, 2013). "Beasts of the Southern Wild' breakout Quvenzhané Wallis to star in new big-screen 'Annie'". EW.com.
- ^ Merle Ginsberg (22 May 2014). "Quvenzhane Wallis Named Face of Armani Junior (Exclusive)". Hollywood Reporter. 23 January 2015 रोजी पाहिले.
- ^ Vincenty, Samantha (November 30, 2016). "Watch Beyonce's 'All Night' Video from 'Lemonade'". PopCrush (इंग्रजी भाषेत). November 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Actress Quvenzhane Wallis Pens and Releases Two Children's Books". October 5, 2017.
- ^ Chevel Johnson (October 2, 2017). "Actress Quvenzhane Wallis taking new on a new role of author". Associated Press. 2018-03-12 रोजी पाहिले.
- ^ Rebecca Sun (November 12, 2017). "Rep Sheet Roundup: WME Signs Trio of Hit Rock Bands From CAA". Hollywood Reporter. 2018-05-12 रोजी पाहिले.