सापुतारा
Appearance
माहिती
[संपादन]सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे ९१ कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वांसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलिमोरा या स्थानकापर्यंत जाऊन तेथून बसने अथवा टॅक्सीने येथे येता येते. गुजरात-महाराष्ट्र राज्यसीमा येथून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले सापुतारा हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.
तपमान
[संपादन]उन्हाळ्यात येथे २७० ते ३१० सेल्सियस एवढे तापमान असते. .हिवाळ्यात ते ९० ते २०० सेल्सियस या दरम्यान राहू शकते.
पाहण्यासारखी ठिकाणे
[संपादन]- अॅक्वेरियम
- एको पॉईंट
- कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट्स व्हिलेज)
- मध संकलन केंद्र
- गीरा धबधबा
- बोट क्लब
- म्युझियम (संग्रहालय)
- रोप-वे
- सनराइज पॉईंट
- सनसेट पॉईंट
- हथगढ किल्ला
पोहचण्याचा मार्ग
[संपादन]- जवळील विमानतळ- सुरत- १७२ किमी.
- जवळील रेल्वेस्टेशन- बिलीमोरा- १७२ किमी
- नाशिक शहरापासूनन रस्त्याने सुमारे ८० कि.मी.
- मुंबई शहरापासून सुमारे १८५ कि.मी.
- सुरत शहरापासून सुमारे १७२ कि.मी.