Jump to content

हिसार गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिस्सार बैल

हिस्सार गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा विविध प्रकारच्या भारतीय गोवंशाचा संकर असल्याचे मानले जाते. यात मुख्यतः हरियाना जातीचा प्रभाव दिसून येतो. सध्या या जातीची संख्या खूपच कमी आहे, कारण सध्याचे सरकारचे धोरण हरियाना जातीचा विकास करण्याचे आहे. हिसार गुरांचे मूळ भारतीय हिसार प्रांतातील असून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर आणि बहावलपूर जिल्ह्यांसह भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात.[] हिसार जिल्ह्यातील हांसी तहसील हे या जातीचे मूळ ठिकाण असून हिसार आणि हांसी जिल्ह्यात ही गुरे आहेत. हे भारतातील पंजाबमध्येही मुबलक प्रमाणात आढळतात आणि सामान्यतः पांढऱ्या रंगाचे असतात. पंजाबमधील काही भागातील शेतकरी या गुरांच्या गडद राखाडी रंगाला प्राधान्य देतात. यामुळे हा गोवंश दोन रंगात विभागून असल्याचे दिसून येते. ही जात त्याच्या मशागतीची क्षमता, सहनशक्ती आणि कामातील चपळता यासाठी प्रसिद्ध आहे. हे हंसी, हिस्सार, भिवानी, सिरसा, रेवाडी आणि सिंगर येथील पशु मेळ्यांमध्ये दिसतात.[][]

वैशिष्ट्य

[संपादन]
  • ही गुरे मध्यम गडद राखाडी रंगाची असतात आणि मान, खांदे आणि कुबड्यांभोवती अगदी गडद रंग असतो.
  • डोके सपाट आणि रुंद कपाळाचे व मध्यम आकाराचे आहे.
  • या गोवंशाला लहान किंवा मध्यम आकाराची शिंगे असतात जी डोक्याच्या बाजूने बाहेर येतात आणि कमानीच्या रूपात वरच्या दिशेने वळलेली असतात.
  • याला हरियाना जातीपेक्षा मोठे आणि लटकणारे कान आहेत.
  • या गोवंशाची शेपटी लहान असून शेपूट गोंडा काळा असतो.
  • बैलांमध्ये उत्तम तग धरण्याची क्षमता असते आणि ते उत्कृष्ट प्राणी म्हणून काम करतात. तर गायी चांगल्या प्रमाणात दूध देतात.[][]

हा गोवंश नोंदणीकृत नसला तरी सामान्य शेतकरी याला 'दुहेरी हेतूचा गोवंश' म्हणून मानतात.

भारतीय गायीच्या इतर जाती

[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Genetic diversity of Hariana and Hissar cattle from Pakistan using microsatellite analysis" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Hissar" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]