Jump to content

मॉन्मथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉन्मथ पहिले विकिपीडिया शहर

मॉन्मथ हे युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतात वसलेले आणि लंडनच्या पश्चिमेला २०० कि.मी. अंतरावर असणारे ऐतिहासिक शहर तसेच एक पर्यटनस्थळ आहे. अलीकडेच या शहराला विकिपीडिया शहर बनवण्याच्या हालचाली चालू आहेत[]. आणि अशी अपेक्षा आहे की २६ मे, २०१२ या दिवशी ते जगातील पहिले विकिपीडिया शहर बनेल. येथे येणारे सर्व पर्यटक आपल्या स्मार्टफोनवर मॉन्मथमधील दखलपात्र सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती विकिपीडियाच्या सौजन्याने मिळवू शकतील. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या क्यूआर संकेतांना आपल्या स्मार्टफोनचा स्पर्श करून पर्यटकांना ही माहिती मिळविता येईल.

पार्श्वभूमी

[संपादन]

इ.स. २०११ सालाच्या शेवटी मॉन्मथ येथील रहिवासी जॉन कमिंग्स यांनी मॉन्मथपीडिया ही संकल्पना मांडली आणि क्यूआरपीडियाचे सहसंस्थापक रॉजर बामकिन यांच्या व विकिमिडिया युकेच्या सहकार्याने मॉन्मथला विकिपीडिया शहर बनवायचा प्रकल्प चालू केला. नंतर त्यांना मॉन्मथशायर काऊंटी कौन्सिल आणि शायर हॉल यांनीही मदत केली.

मॉन्मथपीडियाचे सुरुवातीचे उद्दीष्ट १००० विकिपीडिया लेखांचे आणि प्रत्येक लेखाला क्युआर संकेत देण्याचे होते.[] मेच्या सुरुवातीपर्यंत ७१२ लेखांचे काम पूर्ण झाले होते. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "मॉन्मथ टू बी फस्ट विकी टाऊन". 18 January 2012. 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.
  2. ^ स्टिव्हन मॉरीस. "विकिपीडिया पुट्स मॉन्मथ ऑन फ्रंटीयर ऑफ अ न्यू काईंड ऑफ लोकल हिस्ट्री" (इंग्रजी भाषेत). २२ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]



View of Monmouth from Kymin
मॉन्मथ शहराचे क्मिन्स टेकडीवरून टिपलेले दृश्य