Jump to content

वृंदा करात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वृंदा करात
मतदारसंघ पश्चिम बंगाल

वृंदा करात (जन्म १७ ऑक्टोबर १९४७)[][] या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या ११ एप्रिल २००५ रोजी पश्चिम बंगालसाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.

इ.स. २००५ मध्ये, त्या सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या. १९९३ ते २००४ या काळात त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या (एआयडीड्ब्ल्युए) सरचिटणीस होत्या.[] आणि त्यानंतर उपाध्यक्ष होत्या.

कुटुंब

[संपादन]

त्यांनी ७ नोव्हेंबर १९७५ मध्ये प्रकाश करात यांच्याशी विवाह केला. ते मूळचे केरळी आणि एका प्रमुख सीपीआय(एम) नेता होते.[][] त्यांची बहीण राधिका रॉय हिचे लग्न एनडीटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्याशी झाले आहे.[] इ.स. २००५ मध्ये, त्यांनी अमू[] चित्रपटामध्ये काम केले. जो १९८४ मधील शीख विरोधी दंगलीवर त्यांच्या भाचीने, शोनाली बोस, बनवला होता. त्या इतिहासकार विजय प्रसाद यांच्या काकू आहेत.

साहित्यिक कामे

[संपादन]

वृंदा या सर्वायवल अँड इमॅन्सीपेशन: नोट्स फ्रॉम इंडियन वुमन्स स्ट्रगल्सच्या लेखिका आहेत, हे काम भारतातील महिला चळवळींना भेडसावणाऱ्या आव्हानांना डाव्या दृष्टिकोनातून संबोधित करते. []

संदर्भग्रंथव्

[संपादन]
  • सर्वायवल अँड इमॅन्सीपेशन: नोट्स फ्रॉम इंडियन वुमन्स स्ट्रगल्स. थ्री एसेस कलेक्टिव्ह, नवी दिल्ली, २००५.आयएसबीएन 81-88789-37-2 .

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "B'day Special: Brinda Karat " from 'air-hostess' to first female member of CPM Polit Bureau". India TV News (इंग्रजी भाषेत). 16 October 2013. 9 March 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Sharma, Ashish (11 August 2007). "Interview, livemint". Mint. 20 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2022 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Author profile, threeessays". 2008-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2008 रोजी पाहिले.. Archived from the original Archived 2008-01-04 at the Wayback Machine. on 4 January 2008. Retrieved 17 January 2008.
  4. ^ "Prakash Karat". Jagranjosh.com. 24 April 2014. 25 August 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Comrade Prakash Karat breaks his silence on Prakash Karat - Indian Express". archive.indianexpress.com. 8 February 2008. 25 August 2020 रोजी पाहिले.
  6. ^ Exclusive Interview/Brinda Karat rediff.com; "Since her equally talented sister Radhika Roy and brother-in-law Dr Prannoy Roy run NDTV (New Delhi Television), Brinda's Leftist orientation is intriguing for many"
  7. ^ इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वृंदा करात चे पान (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

[संपादन]