ओझोनचा पट्टा
पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O3ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.
ओझोनची सुरुवात
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९३० मध्ये भौतिक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन याने ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.
अतिनील किरणे आणि ओझोन
[संपादन]हवेतील नायट्रोजन मधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने ३ भाग पडतात : UV-A (४००-३१५ nm), UV-B (३१५-२८० nm), UV-C (२८०-१०० nm).
३५ किमी उंचीवर डायऑक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे UV-C किरणे शोषली जातात. UV-C किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. UV-B किरणे त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे त्वचेचा कर्क रोग होऊ शकतो. ओझोनच्या थरामुळे UV-B किरणे बऱ्याच प्रमाणात शोषली जातात. UV-A किरणे ओझोन थरातून आरपार जातात. ही किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहचतात. परंतु UV-A किरणे सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात.
ओझोनच्या थाराचा क्षय
[संपादन]काही रासायनिक संयुगांमुळे ओझोन थराचा क्षय होऊ शकतो. या संयुगांमध्ये NO (नायट्रीक ऑक्साइड), N2O (नायट्रस ऑक्साइड), OH (हायड्रॉझायल), Cl (क्लोरीन), Br (ब्रोमीन), CFC (क्लोरो फ्लोरो कार्बन), BFC (ब्रोमो फ्लोरो कार्बन) यांचा समावेश होतो. उत्तर अर्धगोलातील ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला ४%नी कमी होत आहे. २००९ मध्ये N2O हा ओझोनच्या थराचा क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता, जो मानवी कृतींतून निर्माण झाला होता.
आंतरराष्ट्रीय उपाय आणि करार
[संपादन]१९७८ मध्ये अमेेेेरिका, कॅनडा आणि नॉरवे या राष्ट्रांनी CFC असलेल्या एरोसॉल स्प्रेवर बंदी आणली. परंतु युरोपीय राष्ट्रांनी एरोसॉल स्प्रेवर बंदी आणण्यास नकार दिला. अमेरिकेत CFCचा वापर इतर उपकरणांमध्ये चालू होता जसे की फ्रिज. १९८५ मध्ये अंटार्टीक येथील ओझोनच्या थराला बोगदा पडल्याचे समोर आल्यामुळे CFCच्या वापरावर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आले.
१९८७ मध्ये झालेल्या मॉन्ट्रेअल करारामुळे CFCचा वापर १९९६ पासून पुर्णपणे बंद करण्यात आला. या करारावर १६० देशांनी सह्या केल्या आहेत. CFC वर आणलेल्या जागतिक बंदीमुळे ओझोन थराचा क्षय होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे शास्त्रज्ञांनी २ ऑगस्ट २००३ रोजी जाहीर केले. गेल्या दशकात ओझोन थराच्या क्षयाचे प्रमाण कमी झाले आहे हे उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे सिद्ध झाले आहे.
CFCचे आयुष्य ५० ते १०० वर्ष असते. त्यामुळे ओझोनचा थर पुर्ववत होण्यासाठी अनेक दशके जाण्यची शक्यता आहे.