महात्मा फुले (चित्रपट)
महात्मा फुले | |
---|---|
दिग्दर्शन | प्रल्हाद केशव अत्रे |
पटकथा | प्रल्हाद केशव अत्रे |
प्रमुख कलाकार |
|
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९५४ |
अवधी | २ तास ११ मि |
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
महात्मा फुले हा १९५४चा प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.
या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१]
भूमिका
[संपादन]- बाबुराव पेंढारकर
- बापूराव माने
- दामूअण्णा जोशी
- सरस्वती बोडस
- अमर शेख
- केशवराव ठाकरे
कथा
[संपादन](मुख्य लेख: ज्योतिराव फुले)
हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित बायोपिक आहे. फुले हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. एकोणिसाव्या शतकातील जन्मलेल्या फुले यांनी, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि इतरांसह मागास जातीतील जनतेच्या उन्नतीसाठी कार्य केले. ते महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते आणि त्यांनी जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली.
पुरस्कार
[संपादन]21 डिसेंबर 1955 रोजी सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी (रजत कमल) पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती रौप्य पदक जिंकले.[२]