युमा (ॲरिझोना)
Appearance
युमा Yuma |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | ॲरिझोना |
स्थापना वर्ष | इ.स. १९१४ |
क्षेत्रफळ | २७६.४ चौ. किमी (१०६.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १४१ फूट (४३ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ९३,०६४ |
- घनता | २८०.६ /चौ. किमी (७२७ /चौ. मैल) |
- महानगर | २,०१,२०१ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०७:०० |
http://www.yumaaz.gov/ |
युमा (इंग्लिश: Yuma) हे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील एक मोठे शहर आहे. युमा शहर अॅरिझोनाच्या नैऋत्य टोकाला ॲरिझोना-कॅलिफोर्निया राज्यांच्या व अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेजवळ सोनोराच्या वाळवंटात व गिला नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली युमा शहराची लोकसंख्या ९३ हजार होती.
युमा येथील अत्यंत रूक्ष हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सरासरी केवळ ३.३६ इंच (८५ मिमी) इतका पाऊस पडतो. २८ जुलै १९९५ रोजी युमामध्ये १२४ °फॅ (५१ °से) इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-02-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत