इंद्रधनुष्य ध्वज (एलजीबीटी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विविध लिंग-लैंगिकतेच्या लोकांच्या स्वभिमानाचा ध्वज
विविध लिंग-लैंगिकतेच्या लोकांच्या स्वभिमानाचा ध्वज
विविध लिंग-लैंगिकतेच्या लोकांच्या स्वभिमानाचा ध्वज
नाव इंद्रधनुष्य ध्वज
वापर विविध लिंग-लैंगिकतेच्या लोकांच्या स्वभिमानाचा प्रतीक
आकार २:३
स्वीकार १९७८
एलजीबीटी गर्व ध्वजांची सहा-रंग आवृत्ती सध्या सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी आवृत्ती आहे. मूळ १९७८ च्या आवृत्तीत दोन अतिरिक्त पट्टे होते: गुलाबी आणि नीलमणी .

एलजीबीटी ध्वज [१][२] किंवा इंद्रधनुष ध्वज १९७८ पासून लेस्बियन, गे, उभयलैंगिक आणि पारलिंगी स्वाभिमानाचा प्रतीक म्हणून वापरला जात आहे. भिन्न रंग एलजीबीटी समुदायातील विविधतेचे प्रतीक आहेत आणि त्यांचे रंग बहुधा संबंधित मोर्चांमध्ये वापरले जातात. जरीया ध्वजाचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला असला तरी सध्या जगभरात त्याचा वापर केला जातो.[३]

इंद्रधनुष्य ध्वज १९७८ मध्ये, कॅनससमध्ये जन्मलेल्या निर्माता आणि कलाकार, गिलबर्ट बेकर यांनी, समलिंगी अभिमानाचे प्रतीक म्हणून लोकप्रिय केले.[४] सध्याच्या आवृत्तीमध्ये लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा अशा सहा पट्टे इंद्रधनुष्याच्या रंगांच्या क्रमाने वापरले आहेत. तथापि, नंतर हा "विविधतेचा ध्वज" म्हणून स्वीकारला गेला असून,[५] "एलजीटीबी" समुदायाचे सदस्य त्यांच्या कारणासह त्याचे चळवळीची ओळख म्हणून या ध्वजाच्या महत्त्वावर जोर देतात.

इतिहास[संपादन]

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत असे अनेक ध्वज वापरीत होते, जे जगातील सर्व लोकांसाठी आंतरराष्ट्रीय एकतेचे प्रतीक होते, परंतु १९७०च्या शेवटी, या रंगांचे संबंध एलजीबीटी स्वाभिमानाचा लोकप्रिय प्रतीक म्हणून विकसित होऊ लागले.

मूळ ध्वज गिल्बर्ट बेकर यांनी संकल्पित केला होता. २५ जून, १९७८ रोजी सॅन फ्रान्सिस्को प्राइड फेस्टिव्हलमध्ये हा ध्वज पहिल्यांदा फडकावला गेला. जूडी गारलँडने सादर केलेल्या "ओव्हर द रेनबो " या गाण्याने बेकर यांना प्रेरणा मिळाली हे नमूद केले गेले आहे.[६] या ध्वजात प्रत्येकाचे अर्थ असलेले आठ रंग आहेत :

गुलाबी: लैंगिकता
लाल: आयुष्य
केशरी: आरोग्य
पिवळा : सूर्यप्रकाश
हिरवा : निसर्ग
नीलमणी : कला
निळा : निर्मळपणा
जांभळा : सत्त्व

२७ नोव्हेंबर १९७८ नंतर सॅन फ्रान्सिस्को बोर्ड ऑफ सुपरवायझर्सचे सदस्य हार्वे मिल्क यांच्या हत्येनंतर इंद्रधनुष्याच्या झेंड्याची मागणी वाढली. मागणीला चालना देण्यासाठी, पॅरामाउंट फ्लॅग कंपनीने रंग गुलाबी रंगा वगळून ध्वजांची नवीन सात रंग असलेल्या आवृत्तीच्या विक्रीस सुरुवात केली. गुलाबी रंगाची उपलब्धी नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे बेकरने नवीन ध्वजाचा स्वीकार केला.[७]

१९७९ मध्ये हा ध्वज पुन्हा सुधारित करण्यात आला. जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रकाश पोलमध्ये झेंडे बसवले गेले होते तेव्हा मध्यवर्ती रंग ध्वजदंडमुळे बरोबर दिसत नसत. अशाप्रकारे, या समस्येचे निराकरण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्वजातील रंगांची संख्या कमी करणे असे ठरले. अशा प्रकारे, सध्याची सहा-पट्ट्यांची आवृत्ती तयार केली गेली.[७]

१९८० च्या दशकात, हा ध्वज आधी अमेरिकेत राष्ट्रीय स्तरावर आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला.

२००३ मध्ये, ध्वजच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त, निर्मात्या गिलबर्ट बेकरने मूळ आठ-पट्टे ध्वज पुन्हा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला, पण एलजीबीटी समुदायात सहा पट्ट्यांचा ध्वज अधिक सुप्रसिद्ध आसल्यामुळे त्यांना फार यश मिळाले नाही. १४ जून २००४ रोजी, समलिंगी कार्यकर्त्यांनी कोरल समुद्रात निर्जन ऑस्ट्रेलियन बेटांवर प्रवास केला आणि ऑस्ट्रेलियापासून मुक्त प्रदेशाची घोषणा करत एलजीबीटी ध्वज उंचावला होता. भारतात देखील अनेक वेळा या ध्वजाचा वापर एलजीबीटी समुदायाच्या स्वाभिमानाचा प्रतीक म्हणून केला गेला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Día Internacional del Orgullo LGBT, 9 claves para una buena redacción". fundeu.es.
  2. ^ "¿Cuál es el origen de la bandera LGTB?". muyinteresante.es.
  3. ^ "Gilbert Baker inventó la bandera del arcoíris: así cambiaron sus colores". El país.
  4. ^ "Under the Rainbow: Oral Histories of Gay, Lesbian, Bisexual, Transgender, Intersex and Queer People in Kansas".
  5. ^ Controversia entre blancos por bandera de la diversidad en la sede partidaria
  6. ^ Higgs, Professor David (1999). Queer Sites: Gay Urban Histories Since 1600 (inglés भाषेत). Psychology Press. pp. 173–. ISBN 9780415158978. 19 de noviembre de 2012 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ a b "Unsung Heroes of the Gay World: Vexillographer Gilbert Baker: The Gay Betsy Ross". UK Gay News (inglés भाषेत). 17 de abril de 2008. Archived from the original on 21 de julio de 2009. 23 de septiembre de 2009 रोजी पाहिले. |access-date=, |date=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)