रोलंड ब्लॅक
Appearance
रोलंड ब्लॅक (२२ जुलै, १९७१:उत्तर आयर्लंड - हयात) हे आयर्लंडचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १४ जुलै २०१६ रोजी आयर्लंड वि अफगाणिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना ५ सप्टेंबर २०१६ रोजी झालेला आयर्लंड वि हाँग काँग हा सामना होता.
ते आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून उभे राहिले आहेत.