आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा
Appearance
आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, साताराची स्थापना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९५५ साली स्वतःच्या हयातीमध्ये केली. ग्रामीण भागातील शाळांना प्रशिक्षित शिक्षक मिळावेत या हेतूने कर्मवीर अण्णांनी या महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक नावलौकिकप्राप्त व उज्ज्वल निकालाची परंपरा असणारे हे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये सध्या बी.एड., एम.फील.(शिवाजी विद्यापीठ) व बी.एड., एम.ए./एम.एस्सी.- विषय संप्रेषण, शालेय व्यवस्थापन (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक) हे कोर्सेस सुरू आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |