अक्षवृत्त
Appearance
पृथ्वीचा नकाशा | |
रेखांश (λ) | |
---|---|
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत. | |
अक्षांश (φ) | |
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात. | |
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. |
पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.
अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
प्रमूख अक्षवृत्ते
[संपादन]- आर्क्टिक वर्तुळ (Arctic circle) (66° 33′ 38″ N)
- कर्कवृत्त (Tropic of Cancer) (23° 26′ 22″ N)
- विषुववृत्त (Equator) (0° N)
- मकरवृत्त (Tropic of Capricorn) (23° 26′ 22″ S)
- ॲंटार्क्टिक वर्तुळ (Antarctic circle) (66° 33′ 38″ S)