कर्कवृत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा

कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.

हे पहा[संपादन]

भारतातील कर्कवृत्त एकूण आठ राज्यातून जाते. १)गुजरात. २) राजस्थान,३) मध्यप्रदेश, ४) छत्तीसगढ, ५) झारखंड, ६) पश्चिम बंगाल, ७) त्रिपुरा, ८) मिझोराम