हरीपंत फडके
Appearance
हरीपंत फडके हे १८ व्या शतकातील मराठा साम्राज्यातले एक महत्त्वाचे सरदार होते.
पेशव्यांच्या दक्षिणेतील हैदर अलीविरुद्धच्या मोहिमेत बादामीच्या वेढ्याचा भार त्यांच्याकडे होता. २० मे, १७८६ रोजी त्यांना सेनापती पद दिले गेले. तेव्हा त्यांच्या हाताखाली पन्नास हजार फौज होती. ही लढाई त्यांनी जिंकली.
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांनी इंग्रजांविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावली होती.