Jump to content

सदस्य:सुबोध कुलकर्णी/धूळपाटी४५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातीलधारूर तालुक्यातील गाव आहे. बीडपासून ५० किलोमीटर अंतरावर तर धारूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र २६२.६५ हेक्टर आहे. या गावात ५५ घरे असून २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २१३ आहे. त्यातील १०७ पुरुष आणि १०६ महिला आहेत.[] कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते. कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.

२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.

गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ व २०१८ स्पर्धेत गाव सहभागी झाले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Indian Village Directory | villageinfo.in". villageinfo.in. 2020-08-28 रोजी पाहिले.