Jump to content

मुरूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मुरूड

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° १९′ ४८″ N, ७२° ५७′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अलिबाग , मुंबई
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
नगराध्यक्ष
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/ 0६ पेण

मुरूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक शहर आहे.

मुरूड-जंजिरा किल्ला, समुद्र किनारा लाभला असल्याने विविध ठिकाणा वरून पर्यटक येतात मुरूडला येण्यासाठी मुंबई - पुण्यावरून अलिबाग रेवदंडा मार्गे येता येते तर रोहा वरून भालगाव, व केळघर मार्गे येता येते. इंदापूर - तळा - आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग 548A मुरूड तालुक्यातून जातो.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. येथे मोठ्या प्रमाणावर डोंगर भाग आहे

लोकजीवन

[संपादन]

मुरूड तालुका पर्यटकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा तालुका आहे. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय, शेती, नारळी सुपारी यांचा बाग, मासेमारी याच्यावर येथिल लोकजीवन अवलंबून

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

मुरूड तालुका हा विविधतेने नटलेला तालुका आहे येथे फणसाड अभयारण्य , मुरूड समुद्र किनारा , काशिद समुद्र किनारा , नवाब राजवाडा, जंजीरा किल्ला , पद्मदुर्ग (कासा),

साळाव येथील बिर्ला समूहाचे गणपती मंदिर, नांदगाव येथे सिद्धीविनायक मंदिर , कोर्लई लाईट हाऊस , कोर्लई किल्ला तसेच पोर्तुगीज चर्च

नागरी सुविधा

[संपादन]

मुरूड येते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे येथुन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी विविध हॉटेल , कॉटेज आहेत, मुरूडला पाणी पुवठ्यासाठी गारंभी व खाराआंबोली धरण येथून पाणी पुरवठा केला जातो. येथे तहसील कार्यालय, तालुका दिवाणी न्यायालय , पोलीस ठाणे , वन विभाग यांचे कार्यालय आहेत. आगरदांडा हे येथील बंदर आहे.

येथे वसंत राव नाईक कला महाविद्यालय , तसेच विविध शिक्षण संस्था आहेत. मुरूड येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहे व इतर खासगी रुग्णालय व दावाखाने आहेत

जवळपासची गावे

[संपादन]

साळाव , कोर्लई, बोर्ली, विहुर, काशिद, नांदगाव, माजगाव, राजपुरी, आगरदांडा, शिघ्रे, एकदरा, हजिफखार, मिठागर, भोईघर, महळूंगे, मांडला, फणसाड, सतिर्डे, येसदे, चोरढे, वाळके, सुपेगाव

संदर्भ

[संपादन]
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम