सुंदर कांड
Appearance
सुंदर कांड | |
लेखक | वाल्मिकी |
भाषा | संस्कृत |
सुंदर कांड (संस्कृत: सुन्दरकाण्ड) हे रामायण महाकाव्यातील पाचवे कांड आहे. मूळ सुंदर कांड संस्कृत भाषेत वाल्मीकींनी रचले.
सुंदर कांड हे असे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत. ह्या कांडात हनुमानाचे साहस, शौर्य आणि त्याचा निस्वार्थीपणा, शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे. माता अंजनी हनुमानास लाडाने सुंदर संबोधत असे आणि ऋषी वाल्मीकींनी हेच नाव निवडले. ह्या कांडात हनुमानाचा लंकेत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला आहे.