Jump to content

युवा नाट्य-साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले राज्यस्तरीय युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साने गुरुजी स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाऊंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी मसापला मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने मसापने हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.

२रे युवा साहित्य-नाट्य संमेलन सातारा येथे २४-११-२०१३ला झाले.

३रे युवा नाट्य-साहित्य संमेलन बारामती येथे २१ मार्च २०१५ रोजी झाले. अभिराम भडकमकर अध्यक्ष होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेने भरवले होते.

४थे (?) युवा साहित्य-नाट्य संमेलन रविवार दि. ११ मार्च २०१८ रोजी इस्लामपूरला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, कवी, गायक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेने भरवले होते.

आणखी युवा साहित्य संमेलने

[संपादन]
  • अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन
  • आंबेडकरी युवा साहित्य संमेलन
  • कोमसापचे युवा साहित्य संमेलन
  • युवा विद्रोही साहित्य संमेलन
  • भारतीय युवा साहित्य संमेलन
  • राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन
  • शाहू, फुले, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन
  • शाहू, फुले, आंबेडकर मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन

हे सुद्धापहा

[संपादन]