Jump to content

सदस्य:अस्मिता साठे/धूळपाटी १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेबी कांबळे (इ.स. १९२९ - एप्रिल २१, इ.स. २०१२) या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत. [][][]

जन्म

[संपादन]

बेबीताई यांचा जन्म १९२९ साली पुरंदर तालुक्यातील वीरगाव नावाच्या खेड्यातील काकडे या दलित कुटुंबात झाला.

बालपण

[संपादन]

बेबीताई यांचे बालपण आजोळी गेले. बेबीताईंचे आजोबा इंग्रजांचे बटलर होते. बेबीताईंचे वडील पंढरीनाथ हे ठेकेदार होते.

शिक्षण

[संपादन]

बेबीताई यांचे शिक्षण फलटण येथे झाले.

कौटुंबिक माहिती

[संपादन]

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कोंडिबा कांबळे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिले.

कारकीर्द

[संपादन]

बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमुचं’ हे आत्मचरित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातल्या महार समाजाचे चित्र हा पुस्तकाचा खरा गाभा आहे.[]

दलित स्त्रीचे मराठीतले पहिले आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान लाभले आहे. 'प्रिझन्स वुई ब्रोक' या नावाने या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाला आहे.[]

मृत्यू

[संपादन]

२१ एप्रिल २०१२ रोजी फलटण येथे निधन झाले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/articleshow/12904269.cms. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Rege, Sharmila (2006). Writing Caste, Writing Gender: Reading Dalit Women's Testimonios (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 978-81-89013-01-1.
  3. ^ Tharu, Susie J.; Lalita, Ke (1991). Women Writing in India: The twentieth century (इंग्रजी भाषेत). Feminist Press at CUNY. ISBN 978-1-55861-029-3.
  4. ^ kuffir. Round Table India (इंग्रजी भाषेत) http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=5035:i-hid-everything-i-wrote-for-20-years&catid=127:post-ambedkar-leaders&Itemid=158. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Saxena, Mini. Feminism In India (इंग्रजी भाषेत) https://feminisminindia.com/2018/03/15/babytai-kamble-chronicler-dalit-women/. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)