Jump to content

चिं.ग. कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिंतामण गणेश कर्वे (जन्म:वडोदरा१६ डिसेंबर, १९६०) हे मराठी कोशकार व लेखक होते.

यांचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानकोशकार केतकरांचे साहाय्य्क म्हणून त्यांनी काम केले. तसेच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यानी प्रचंड मदत केली. १९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. सुलभ विश्वकोशाच्या रचनेतही त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्यसंप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोष अशा अनेक कोशांच्या रचनेत म्हणून त्यांनी कार्य केले.

त्यानी मानवी संस्कृतीचा इतिहास', 'मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी', 'कोशकार केतकर', 'प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये', आनंदीबाई पेशवे आदी ग्रंथांसह त्यांनी विविध नियतकांलिकातून संस्कृती, इतिहास, साहित्य भाषा या विषयांवर ४०हून अधिक लेख लिहिले आहेत. याखेरीज पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे,' पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे,' 'छोट्या शोधनोंदी,' 'व्यक्ति नोंदी,' 'व्यक्तिपरिचय' हे त्यांचे लेखन कार्य अतिशय मोलाचे आहे.

महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पहिले जाते. त्यांच्या कोशाचे वैशिष्ट्य म्हणजे माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा, सूक्ष्म संशोधन आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन. भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले. त्यांचे कोशरचनेचे कार्य पुढील कोशरचनाकर्त्यांना प्रेरणादायी ठरले.

१६ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

पुस्तके

[संपादन]
  • आनंदीबाई पेशवे
  • कोशकार केतकर
  • छोट्या शोधनोंदी
  • पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे
  • पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे
  • प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये
  • मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी
  • मानवी संस्कृतीचा इतिहास
  • व्यक्ति नोंदी
  • व्यक्तिपरिचय