Jump to content

सुनील रावसाहेब वलटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनील रावसाहेब वलटे
टोपणनाव: नायब सूबेदार सुनील रावसाहेब वलटे
मृत्यू: ऑक्टोबर २२, २०१९
नौशेरा सेक्टर जम्मू काश्मीर
संघटना: भारतीय सेना
धर्म: हिंदू

सुनील रावसाहेब वलटे[] (- २२ ऑक्टोबर, इ.स. २०१९:नौशेरा सेक्टर, जम्मू काश्मीर) हे भारतीय सेनेतील सैनिक होते. दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पीओकेत १८ दहशतवादी, १६ पाक सैनिक ठार वालटे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांचे चे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.

  1. ^ "जम्मू काश्मीर – पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण". Loksatta. 2019-11-02 रोजी पाहिले.