सागर कारंडे
Appearance
सागर कारंडे | |
---|---|
जन्म |
१ जानेवारी, १९८० नाशिक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेता, लेखक |
प्रसिद्ध कामे | चला हवा येऊ द्या |
नातेवाईक |
पत्नी - सोनाली कारंडे मुलगी - साई कारंडे |
सागर कारंडे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाई फू या कार्यक्रमात त्याने भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या कार्यक्रमातील आठव्या पर्वात ही जोडी विजेती ठरलेली आहे. यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका सादर केल्या आहेत. विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने केलेले विविध भागातील पत्र वाचन हृदयस्पर्शी ठरलेले आहे.
चित्रपट
[संपादन]- जलसा (२०१६)
- फक्त लढ म्हणा
- बायोस्कोप (२०१५)
- माय हिंदू फ्रेंड
- कुतुब
- एक तारा (२०१५)
- चल धरपकड
- बाई गं (२०२४) [१]
कार्यक्रम
[संपादन]२. फू बाई फू
- ^ "Bai Ga Movie (2024): Cast, Trailer, OTT, Songs, Release Date | Baii Ga | बाई गं | Exclusive 2024 - Rang Marathi". रंग मराठी. 22 जून 2024 रोजी पाहिले.