विकिपीडिया:शंभर मराठी फायदे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडिया हा मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांना कसा फायद्याचा ठरेल/ठरत आहे या बाबत तुमच्या प्रतिक्रीया लिहा.
- निरंतर शिक्षण
- स्वयं-शिक्षण सुकर होते.
- शैक्षणिक खर्च आणि किमती आटोक्यात राहण्यास मदत होते.
- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प(प्रॉजेक्ट) बनवण्याकरिता प्राथमिक माहिती उपलब्ध होते.
- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण सबळ संदर्भानिशी एखादे विवेचन करण्याची सवय होते.
- विकिपीडियावर लेखन करणार्या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षणात 'प्रबंध कसे लिहावेत' याची पूर्व तयारी होते.
- विकिपीडिया लेखन आणि वाचनाने सामान्य ज्ञानात मोलाची भर पडते. स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो.
- भाषांतर करण्यात किंवा भाषांतरणे तपासण्यात सहभाग घेतल्यास नवीन भाषा शिकता येतात,शब्दा-शब्दांमधील विविध बारकावे लक्षात येतात, तसेच भाषा शिक्षणावर प्रभूत्व मिळते.
- एखाद्या विषयाबद्दल 'समर्थन' करणार्या तसेच 'विरोध' करणार्या मतांशी परिचय होतो, त्या मुळे दृष्टीकोण एकांगी होण्याचे टळते.
- टिमवर्कची आणि परस्पर सहकार्याची तसेच इतरांना प्रोत्साहन देण्याची सवय लागते.
- एखादा नवीन विषय आल्यास विकिपीडियातील सोप्या भाषेत चटकन तोंडओळख होते व समजण्यास सोपे जाते.
- नवीन शहरात किंवा संस्थेत जाण्यापूर्वी त्या शहरांबद्दल किंवा संस्थेबद्दल समतोल माहिती मिळते.
- ज्ञानाचा मुक्त उपयोग करता येतो.
- वेळ सत्कारणी आणि सकारात्मक कामात व्यतीत होतो.
- विकिपीडियात वाचन आणि संपादन म्हणजे मजा असते.
- आपणास आवडणार्या तत्वज्ञानाबद्दल आपली आणि इतरांची मते पडताळून पाहता येतात.
- आपले गाव,महाविद्यालय इत्यादी बद्दल माहितीत भर पडते.
- आपणास माहिती नसलेल्या किंवा त्रोटक माहिती असलेल्या विषयावर पण लेख सुरू करता येतो आणि इतर लोक त्या बद्दल काय माहिती भरत आहेत ते बघता येते
- गरजू जिज्ञासूंना सहाय्य देता येते.
- येथे ज्ञान देतांना आणि घेताना बंधने कमीतकमी आहेत.
- सॉफ्टवेअर सहीत प्रत्येक गोष्ट स्व्तःची स्वतःस बनवता येते.
- मिडियाविकी सॉफ्टवेअर विकिपीडिया शिवाय वैयक्तीक किंवा संस्थेच्या कामाकरिता विनामूल्य वापरता येते.
- हे सॉफ्टवर वापरून सहकारी/शासकीय संस्थेचे संकेतस्थळ(वेबसाईट) बनवल्यास कमीत कमी खर्चात त्याचे सुचालन(मेंटेन) होते आणि लोकशाही आणि सहकारी मूल्यांचे जतन होते.
- सभोवतालच्या मानवी समाजाला आणि मूल्यांना अधीक चांगले समजावून घेता येते व समजावताही येते.
मराठी माध्यमभाषेकरिता फायदे आणि तोटे
[संपादन]- (माध्यम)"हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खर्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. " [१] आणि मराठी ही ज्ञानभाषा व्हावी याकरिता मराठी विकिपीडिया सर्वांत अग्रेसर असलेले संकेतस्थळ आहे.
मराठी भाषिकांकरिता फायदे
[संपादन]नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचविता येते.
महाराष्ट्रा करिता फायदे
[संपादन]विद्यार्थ्यांकरिता फायदे
[संपादन]प्राथमिक इयत्तेचे शिक्षक आणि पालक
[संपादन]===माध्यमिक इय्यतेचे शिक्षक आणि पालक=तोटे ==
अकरावी बारावीचे विद्यार्थी
[संपादन]बारावी उत्तर शिक्षण, विद्यार्थी जीवन, करिअर ची सुरूवात
[संपादन]- वृत्त आणि माध्यमांच्या विद्यार्थ्यांना विकिन्यूज हा सहप्रकल्प उपलब्ध आहे
स्पर्धात्मक परिक्षेच्या उमेदवारांना फायदे
[संपादन]वृत्तसंस्थांकरिता फायदे
[संपादन]- काळजी पूर्वक निवड केल्यास छोट्या वृत्तपत्र आणि मासिकांकरिता लेख, छायाचित्रे इत्यादी कोणत्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध होऊ शकतात.
- विकिपीडियावर दिलेले संदर्भ सत्यता तपासण्याकरिता वापरता येतात.
- व्यक्तिगत ब्लॉग पेक्षा विकिपीडियातील माहिती स्वयंसेवी पहारा आणि गस्त झालेली असण्याची शक्यता असल्यामुळे अधिक विश्वासार्ह असू शकते.
प्रकाशकांकरिता फायदे
[संपादन]- काळजी घेतल्यास बरेचसे चांगले लेख या मुक्त स्रोतातून विना मोबदला घेता येउ शकेल.
- तुमच्या तर्फे प्रकाशीत पूस्तकाचा, विकिपीडियात अल्प परिचय,लेखक परिचय किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून प्रामूख्याने वापर झाला असेल तर अप्रत्यक्षरित्या विक्रीत वृद्धी मीळू शकते,(अर्थात, हे लक्षात घ्या विकिपीडिया स्वयं-प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला देते).
लेखकांकरिता फायदे
[संपादन]- विकिपीडियावर वाचन केल्यामुळे विवीध विषया बद्दल सहज ज्ञान वाढवून घेता येते.
- संदर्भ अभ्यासता येतात.
- तुमच्या तर्फे प्रकाशीत पूस्तकाचा, विकिपीडियात अल्प परिचय,लेखक परिचय किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून प्रामूख्याने वापर झाला असेल तर अप्रत्यक्षरित्या विक्रीत वृद्धी मीळू शकते,(अर्थात हे लक्षात घ्या विकिपीडिया स्वयं-प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला देते).
- आपल्या पुस्तकाचा समाजात वापर वाढवून हवा असेल तर ते 'प्रताधिकार मुक्त' जाहीर करता येते.
शिक्षण संस्थाकरिता फायदे
[संपादन]- संदर्भाकरिता प्रॉजेक्टस तयार करून घेण्याकरिता विकिपीडियाचा वापर करून घेता येतो.
- वार्षिक शैक्षणिक अंकात विकिपीडियातील लेख घेता येतात.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी ठेवण्यात मदत होऊ शकते.
वाचनालयांकरिता फायदे
[संपादन]- प्रताधिकार रहीत जुनी दूर्मीळ पुस्तके विकिपीडियावर जतन करता येतात.
- वाचन संस्कृतीस बढावा मिळतो
- विकिपीडियावरील संदर्भात वापरलेल्या नावांच्या शोधात जुने सदस्यवाचक वाचनालयांकडे परतून येउ शकतात त्यामुळे (त्यांच्या परत न आलेली परत येण्याची)?? शक्यता वाढते , शिवाय सदस्य परत आल्यामुळे सभासद फिसचे उत्पन्नात वाढ होते
शिक्षकांकरिता फायदे
[संपादन]- शाळा महाविद्यालयात पाठ घेण्यापूर्वी संबधीत विषयाबद्दल अधिक माहिती मिळवता येते.
- संदर्भाकरिता प्रॉजेक्टस तयार करून घेण्याकरिता विकिपीडियाचा वापर करून घेता येतो.
- वार्षिक शैक्षणिक अंकात विकिपीडियातील लेख घेता येतात.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी ठेवण्यात मदत होऊ शकते.
संशोधकांकरिता फायदे
[संपादन]- आपल्याला माहित नसलेले दृष्टीकोण, संदर्भ अवगत होतात.
- भाषा विषयक संशोधनास आणि तंत्रज्ञानास प्रोत्साहन मिळते.
- आंग्ल भाषेत वापरलेल्या बहुतेक तांत्रिक शब्दांस पर्यायी मराठी शब्द अल्प परीश्रमाने उपलब्ध होतात.
भाषांतरकारांकरिता फायदे
[संपादन]- विकिपीडियावर भाषांतरे करून स्वत:ची कौशल्ये शाबूत ठेवता येतात किंवा विकसित करता येतात.
- एखादे वाक्य किंवा लेख इतर भाषात इतरांनी कसे भाषांतरीत केले आहे ते पाहता येते.
- साचे(template)आणि सांगकामे(bot) तंत्रे भाषांतरात अमलात आणून भाषांतरांचा वेग वाढवता येतो.
- नवीन भाषा तसेच भाषा शैली अवगत होतात.
- IPA सारख्या भाषातंत्रांचा परिचय होतो
इतर मिडियाकरिता फायदे
[संपादन]- एखाद्या विषयास अनुसरून दालन बनवणे व अद्ययावत ठेवणे यामुळे वेबमास्टर्स किंवा अशा करियरची अपेक्षा असलेल्यांना (पोर्टल्स)व वेबसाईटच्या बांधणीची माहिती होते.
- माध्यम शाखेच्या विद्यार्थी वृत्तलेखनात तरबेज होऊ शकतात.
- प्रेक्षकांना कार्यक्रमातील विषयांचे इतर संदर्भ शोधण्यास मदत होते.
इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मराठी मुलांना फायदे
[संपादन]- इंग्रजी लेखात न समजेले संदर्भ मराठीत व मराठीत न समजलेले संदर्भ इंग्रजीत शोधता येतात.
- मातृभाषेवर प्रभूत्व मिळवता येते.
- विकिपीडिया असे एक संकेत्स्थळ आहे कि ज्यात वापरलेले शब्द आवश्यकतेप्रमाणे सर्वांना समजण्याजोगे कालानुरूप ठेवता येऊ शकतात किंवा कालानुरूप सहज बदल करता येतात.
विविध संस्थाकरिता फायदे
[संपादन]- नवीन सकारात्मक संरचना निर्मिती आणि कन्स्ट्रक्टीव्ह कामात पुढाकार घेण्याची सवय कर्मचारीवर्गास लागल्यामुळे संस्थांची कार्यक्षमता वाढते आणि संस्था बळकट होण्यास मदत होते.
नौकरदार वर्गाकरिता फायदे
[संपादन]- सामाजिक भान व त्या योगाने देशप्रेम निर्माण होते.
- कळत नकळत समाजसेवा होते.
- नवीन सकारात्मक संरचना निर्मिती आणि कन्स्ट्रक्टीव्ह कामात पुढाकार घेण्याची सवय कर्मचारी वर्गास लागल्यामुळे संस्थांची कार्यक्षमता वाढते.
- नौकरी व्यवसायात मुद्देसूद मांडणी/लेखन करण्याची सवय होते.त्यामुळे अनायासेच ज्ञानवाढ होते.
- कामात पारंगतता येते.एखादे काम पूर्वी लागणार्या वेळेपेक्षा कमी वेळात पूर्ण होते.
इव्हेंट मॅनेजरना फायदे
[संपादन]- 'क्विझ शो' सारख्या कार्यक्रमात किंवा इव्हेंट मध्ये विकिपीडियावरील माहिती वापरता येते.
- आपणास हे माहित आहे का ? विवीध कार्यक्रमात वापरता येते.
- प्रोग्रामर्स निवेदक यांना अधिक एक्स्पोजर मिळते.
विकिपीडिया व इतर मराठी संकेतस्थळे यातील साम्य, फरक आणि फायदे-तोटे
[संपादन]- मराठी संकेतस्थळांच्या पानावर इतस्त्तः विखूरलेली माहिती एका ठिकाणी आणून विषयाची मुद्देसुद बांधणी आणि माहितीचे सुनियोजीत वितरण होऊ शकते.
- विकिपीडियावर प्रथम लिहिलेली माहिती आपोआपच प्रताधिकार मुक्त राहू शकते.इच्छा असूनही अनवधानाने लेखन प्रताधिकार मुक्त करण्याचे राहून जाण्याचा प्रसंग टळतो.त्यामुळे तुम्ही तयार केलेल्या माहितीचे अधिक मुक्त हस्ताने वितरण शक्य होते.
- हेसुद्धा पहा विकिपीडिया:स्वॉट