Jump to content

मुरलीधर कापडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दिग्दर्शक

जन्मदिनांक अनुपलब्ध - १२ ऑक्टोबर २००६

मुरलीधर कापडी यांनी अमेरिकेत चित्रपट प्रशिक्षण घेऊन आलेल्या कुमारसेन समर्थ यांच्याकडे प्रथम उमेदवारी करायला प्रारंभ केला. ते वर्ष होते १९५४. त्यानंतर राजा ठाकूर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर त्यांना स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी खूप उशिरा, म्हणजे १९७७ साली मिळाली. चित्रपट होता ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’.

त्यानंतर ‘नाव मोठं लक्षण खोटं’ (१९७७), ‘चोरावर मोर’ (१९८०), ‘कडकलक्ष्मी’ (१९८०), ‘भुजंग’ (१९८२), ‘सावित्री’ (१९८३), ‘बिनकामाचा नवरा’ (१९८४), ‘सगेसोयरे’ (१९८५), ‘किस बाई किस’ (१९८८), इत्यादी मराठी चित्रपट व ‘आओ जाओ घर तुम्हारा’ (१९८४) हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.