Jump to content

श्रुती पानसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. श्रुती पानसे ह्या मस्तिष्काधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून मराठी लेखिका आहेत. त्यांचे शिक्षण मराठी भाषेत एम.ए. पर्यंत झाले असून त्यांनी 'मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र' या विषयात पीएच.डी. केली आहे.

पानसे यांनी अक्रोड - Brain & Behaviour courses - या कोर्स मध्ये मुलांच्या वयोगटानुसार मेंदू कार्य समजून घेण्यासाठी, तसेच अभ्यास सोपा करण्यासाठी , multiple intelligences, emotional intelligence या विषयावर कोर्सची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचे लेखन केले आहे. याच सोबत त्यांचे 'डोक्यातला मी' हे आॅडिओबुक storytel वर प्रसिद्ध झाले आहे.

मुलांसाठीच्या 'चिकूपिकू' या मासिकाच्या संपादक मंडळात सहभागी त्या सहभागी होत्या. मेंदू समजून घेताना' या विषयावर त्यांनी व्याख्यानं आणि कार्यशाळा घेतल्या आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • अभ्यास आनंददायक कसा कराल?
  • अशी का वागतात मुलं?
  • आधुनिक स्फूर्तिकथा
  • आनंदाची दैनंदिनी : वाट सुखा-समाधानाची (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डाॅ. रेखा शेट्टी)
  • उत्तरांच्या वाटेवर
  • टीनएजर्सच्या मनात
  • Dare To Dream : Ten Inspirational Stories For The New Generation (इंग्रजी)
  • निवडक डेल कार्नेगी (अनुवादित; मूळ इंग्रजी -डेल कार्नेजीची तीन पुस्तके)
  • डोक्यात डोकवा
  • पहिली आठ वर्ष - सहज शिकण्याची
  • पाळणाघर असं हवं
  • बहुरंगी बुद्धिमत्ता
  • मुलांचे ताण जबाबदारी पालकांची