Jump to content

ए.पी. धांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रा. डाॅ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे (जन्म : अमरावती, १७ जुलै १९७०) हे वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिणारे लेखक आहेत. त्यांचे बहुतांशी शिक्षण हे अमरावतीतच झाले. इलेक्ट्राॅनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयांत त्यांनी १९९१ साली बी.ई. आणि १९९९ साली एम.ई. केले. २००७ साली ते पीएच.डी. झाले. सन १९९१पासून चार वर्षे औद्योगिक व्यवस्थापनात काम केल्यावर ते शिक्षणक्षेत्रात आले.. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉंप्यूटर टेक्नाॅलाॅजीमध्ये त्यांनी २००८ ते या काळात प्राध्यापकी केली आणि नंतर ते पदव्युत्तर विभागाचे प्रमुख झाले. एकविसाहून अधिक वर्षे ते शिक्षणक्षेत्रात आहेत.

खगोलशास्त्र हा प्रा. ए.पी धांडे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावरचे शोधनिबंध त्यांनी विद्यार्थ्यांकडून लिहवून घेतले आहेत. त्यांच्या पुस्तकांतून विश्वनिर्मिती, ब्रह्मांड आणि ईश्वर यांसंबंधीचे त्यांचे विचार वाचायला मिळतात.

प्रा. डाॅ. ए.पी धांडे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • Analogy between two creations: Human and computers (सहलेखक - डाॅ. व्ही.टी. इंगोले व प्रा. व्ही.आर. घिये) (२०१५)
  • Contemplation on Universe before Big Bang
  • कृष्ण पदार्थ आणि कृष्ण ऊर्जा
  • Ternary Digital System : Concepts and Applications (सहलेखक - डाॅ. व्ही.टी. इंगोले व प्रा. व्ही.आर. घिये) (२०१४)
  • पुरातन तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान - बदलत्या युगाचा प्रवास
  • ब्रह्मांड आणि ईश्वर
  • माझा जीवन प्रवास ……..काही आठवणी (२०१४)
  • माझ्या गावातील आठवणी
  • विश्वातील जीवसृष्टीचा प्रवास (वैज्ञानिक माहिती)

ए.पी. धांडे यांचे काही महत्त्वाचे शोधनिबंध व अहवाल (सुमारे ५१)

[संपादन]
  • An Overview on Properties, Parameter Consideration and Design of Meandering Antenna (सहलेखक - व्ही. अंभोरे) (२०१२)
  • Internet voting (e-Voting) in Indian enviorenment (सहलेखक - एस.एन. खांडेकर) (२०११)
  • Investigation of A Special Feature of Plasma Column: Nested Plasma Antenna (सहलेखक - एस. भोंडे, व्ही.आर. घिये) (२०१४)
  • Mono-pulse comparator network system with hybrid rings (सहलेखक - भिलेगावकर) (२०१३)
  • Packet Drop Reduction in Horizontal Handover (सहलेखक - अंबुडकर) (२०११)
  • Protocol for Optimized Delay during Authentication (सहलेखक - अंबुडकर) (२०१२), वगैरे वगैरे


(अपूर्ण)