चेटीचंड
चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.[१]सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.
स्वरूप
[संपादन]उधेरोलाल किंवा झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो.[२] ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. जलाची पूजा करण्यासाठी चेटीचंडच्या दिवशी पाण्याच्या साठ्याला दूध,पीठ आणि तांदूळ असे एकत्र मिश्रण अर्पण करतात. नदी किंवा विहीर अशा ठिकाणी जाऊन अशी पूजा होते.[३]
काही व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात.[३] सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात,एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात. या दिवशी झुलेलाल या देवतेची मूर्ती घेऊन मिरवणूक काढतात. मनोरंजनासाठी जत्रांचे आयोजन केले जाते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Kumar, P. Pratap (2014-09-11). Contemporary Hinduism (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317546368.
- ^ Falzon, Mark-Anthony (2004). Cosmopolitan Connections: The Sindhi Diaspora, 1860-2000 (इंग्रजी भाषेत). BRILL. ISBN 978-90-04-14008-0.
- ^ a b DADUZEN, Dayal N. Harjani aka (2018-07-18). Sindhi Roots & Rituals - Part 2 (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781642494808.
- ^ Falzon, Mark-Anthony (2004). Cosmopolitan Connections: The Sindhi Diaspora, 1860-2000 (इंग्रजी भाषेत). BRILL. ISBN 9789004140080.