विकिपीडिया:हे तुम्हांला माहिती हवे
हे पान एक निबंध आहे.. यात एक किंवा अधिक विकिपीडिया सदस्यांचा सल्ला किंवा मते आहेत. हे पान विकिपीडियाच्या धोरण किंवा मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक नाही कारण ते समुदायाने मतदान किंवा इतर प्रक्रियेने मान्य केलेले नाही. निबंधामध्ये सर्वसामान्यपणे सर्वमान्य नियम अथवा काही सदस्यांना मान्य असलेले नियमच दर्शविले जातात. |
या पानाचा थोडक्यात अर्थ: जर तुम्हांला विकिपीडियावरील महत्त्वाच्या धोरणांविषयीची माहिती एकाच पानावर हवी असेल तर, तुम्ही योग्य पानावर आला आहात. |
लेखांविषयी
[संपादन]उल्लेखनीयता
[संपादन]लेखांमध्ये पुरेपूर नोंद उपलब्ध असणारे
विश्वासार्ह संदर्भ
पुरेपूर नोंद उपलब्ध असणे
[संपादन]इथे लेखाच्या विषयाचा स्पष्ट, विस्तृत उल्लेख असणारे संदर्भ अपेक्षित आहेत. सहज नावाचा उल्लेख असलेले, याद्यांमधले उल्लेख, किंवा तत्सम उल्लेख असलेले संदर्भ निरुपयोगी ठरतात. शिवाय एक संदर्भ पुरेसा नसुन प्रत्येक विधानाला एक अश्या संख्येने प्रत्येक विधानाला एक असे अनेक संदर्भ असणे आवश्यक आहे. या संदर्भांमधूनच हे निश्चित करता येते की, लेखातील विषय उल्लेखनीय आहे.
विश्वासार्ह
[संपादन]विकिपीडियावर संदर्भ देताना विश्वासार्ह स्त्रोताचेच संदर्भ दिले जावेत. मोठी वृत्तपत्रे, वस्तुनिष्ठ आणि मोठ्याप्रमाणावर प्रकाशने करणारी पुस्तके. वस्तुनिष्ठता आणि अचुकता जोपासणारी चांगल्या गुणवत्तेची मुख्यप्रवाही प्रकाशने. यांचेच संदर्भ दिले जावेत असे संदर्भ विश्वासार्ह असतात. या विरुद्ध चर्चापाने, फेसबुक, मायस्पेस, ब्लॉग्ज, एकाच व्यक्तीने/लेखातील विषयाने स्वत:प्रकाशित केलेली पुस्तके आणि संकेतस्थळे विश्वासार्ह नसतात.