विकिपीडिया:मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा, एस्.एन्. डी.टी. महाविद्यालय,पुणे
"विवेक चरित्रकोश कार्यशाळा" ही मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा आहे.
आयोजक
[संपादन]विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा.
दिनांक आणि वार
[संपादन]शनिवार दिनांक ९ फेब्रुवारी २०१९
वेळ
[संपादन]सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५. ००
स्थळ
[संपादन]नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे
सहभागी
[संपादन]नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी
प्रशिक्षक
[संपादन]१. डॉ. आर्या जोशी
२. सुरेश खोले
३. ज्ञानदा गद्रे-फडके
स्वरूप
[संपादन]विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत चरित्रकोशातील नोंदी विकिपीडियावर संपादित करणे हा मुख्य हेतू होता. सदर स्वरूपाची ही पहिलीच कार्यशाळा झाली.
- प्रशिक्षण वर्गात काय काय झाले ?
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या उपप्राचार्या प्रा. कुलकर्णी यांनी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला आणि सर्वांचे स्वागत केले. विवेक चरित्रकोशाचे कार्यकारी संपादक श्री. महेश पोहनेरकर यांनी चरित्रकोश प्रकल्प आणि त्यातील नोंदी मुक्त ज्ञानकोशात आणणे याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. कोशसाहित्याचे महत्व सांगितले.विवेक चरित्रकोशाच्या समन्वयक चित्रा नातू- वझे यांनी प्रशिक्षक वर्गाची ओळख करून दिली. सदर प्रशिक्षण वर्गात मुक्त स्रोत आणि मराठी विकिपीडिया म्हणजे काय याविषयी सुरेश खोले यांनी माहिती दिली. मराठी विकीवरील आपल्या आवडीच्या विषयांचा शोध घेऊन त्याविषयीच्या लेखांचा परिचय करून घेण्यास सांगितले. त्यानंतर आर्या जोशी यांनी सहभागी विद्यार्थिनींकडून खाती उघडून घेतली आणि सदस्यपान तयार करण्यास शिकविले. भोजनानंतरच्या सत्रात आर्या जोशी यांनी चरित्र नोंद कशी संपादित करावी याची माहिती दिली आणि विकीवरील अशा स्वरूपाच्या नोंदी संपादित करताना कोणते मुद्दे घ्यावेत व ते कसे संपादित करावेत याविषयी माहिती दिली. सुरेश खोले यांनी संदर्भ नोंदविण्याची उपयुक्तता आणि संदर्भ कसे जोडावेत, शोधावेत याविषयी शिकविले. ज्ञानदा गद्रे-फडके यांनी विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वरूपात साहाय्य करून अधिक माहिती दिली.
- काय राहिले आणि का?
सदर कार्यशाळेत असे अनुभवास आले की सहभागी सदस्या या तंत्रज्ञान विषयात आवश्यक प्राविण्य असलेल्या नव्हत्या. त्यामुळे संगणकीय तंत्रज्ञान त्यांना प्रारंभीपासून शिकविणे या प्रक्रियेत अधिक वेळ द्यावा लागला, त्यामुळे प्रत्यक्ष संपादने तुलनेने कमी झाली. याचा बोध घेऊन पुढील कार्यशाळा योजताना या अनुभवाचा वापर मार्गदर्शक म्हणून करता येईल.
- एकूण फलित
विकिपीडीयावर संपादने करणे आणि त्यापूर्वी या व्यासपीठाची ओळख करून घेणे हे या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थिनी गटाला साध्य झाले असे सांगता येईल. युवा वर्गाने विकीवर संपादक म्हणून कार्यरत होण्याचा हा पहिला टप्पा म्हणता येऊ शकेल.
सहभागी सदस्य उपस्थिती
[संपादन]- आर्या जोशी (चर्चा) ११:५८, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Sujata Jijabhua Pagire (चर्चा) १४:४४, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Pranali sutar (चर्चा) १४:४५, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Kranti Gadsing (चर्चा)
- Sarika polake (चर्चा)
- Pranali Landage (चर्चा)
- Shraddha Shendge (चर्चा)
- पौर्णिमा धेंडे (चर्चा) १५:२०, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Komalkangude (चर्चा)
- Shraddhawakode (चर्चा)
- Pranali sutar (चर्चा) १६:२८, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Aartigangane (चर्चा) १६:२७, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- रमा कौस्तुभ उपासनी (चर्चा) १६:३२, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- Rasikayenpure (चर्चा) १७:०५, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- दमयंती नार्वेकर (चर्चा) १७:१०, ९ फेब्रुवारी २०१९ (IST)
- सपना गावीत (चर्चा)
- साक्षी कांबळे. (चर्चा)
- ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा)
- QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:४९, १० फेब्रुवारी २०१९ (IST)
चित्रदालन
[संपादन]-
मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा प्रास्ताविक
-
विवेक समूहातर्फे प्रशिक्षण कार्यशाळेत परिचय करून देताना
-
कार्यशाळेत मोबाईलवर संपादन प्रशिक्षण