वासुदेव चोरघडे
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
वासुदेवराव गोविंद चोरघडे (जन्म : १२ एप्रिल १९३१; - नागपूर, ४ नोव्हेंबर २०१८) हे संस्कृत पंडित आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांचे शालेय शिक्षण नरखेड व नंतर वरूडला झाले. संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. [१] नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात.
व्यवसाय
[संपादन]आॅडिट आणि अकाऊंट्सच्या परीक्षा देऊन ते पोस्ट खात्यात लेखापरीक्षक झाले, व तेथूनच निवृत्त झाले. टपाल खात्यात नोकरी करीत असताना अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक संस्कृत वाङ्मयाचा आणि दर्शनशास्त्राचा अभ्यास केला.
लेखन
[संपादन]वासुदेवराव चोरघडे यांनी एकूण सोळा पुस्तके लिहिली, तत्त्वज्ञानावर अनेक लेख लिहिले आणि आदि शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर टीका लिहिल्या. स्वामी समर्थ आणि अन्य संतांच्या व तत्त्वज्ञांच्या लिखाणावर त्यांनी समीक्षणात्मक लेख लिहिले. चोरघडे यांनी ३०हून अधिक पुस्तकांच्या प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांची गुजराती रूपांतरे झाली. त्यांचे लेख प्रज्ञालोक, चैतन्यप्रसाद, समाजयोग, योगप्रकाश आणि वासुदेवनिवास यांसारख्या नियतकालिकांमधून नेमाने प्रकाशित होत.
वासुदेवराव हे नागपूर नभोवाणी केंद्राच्या नभोनाट्यांचे ख्यातनाम लेखक होते. त्या आकाशवाणी केंद्रावर चोरघडे यांनी सुमारे ५० वर्षे व्याख्याने दिली आणि सुवचने प्रसारित केली.
धार्मिक विषयांवर विविध प्रकारचे लेखन करणारे वासुदेवराव चोरघडे हे वक्तेही होते. ते धार्मिक प्रवचने करत.
समाजकार्य
[संपादन]वामनराव चोरघडे हे भगवद्गीता सेवा समिती नावाच्या संस्थचे, निवृत्त केंद्रीय कर्मचारी संघटनेचे व नागपूरच्या वरिष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष होते. चोरघडे हे सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र आणि भारतीय विद्याप्रसारक संस्था आदींचे सक्रिय सभासद होते.
वासुदेवराव गोविंद चोरघडे यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण १६)
[संपादन]- श्री दत्तमाहात्म्य (संपादित)
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- राम शेवाळकर प्रतिष्ठानने त्यांना ज्ञानसाधू म्हणून गौरविले होते.
- रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाने आणि विदर्भ साहित्य संघाने त्यांचा गौरव केला होता.
- ज्ञानसाधू चोरघडे यांच्या सहस्रचंद्रदर्शानानिमित्त प्रसन्न मुजुमदार यांनी 'श्री वासुदेव नमोऽस्तुते' नावाचा गौरवग्रंथ संपादित करून प्रकाशित केला होता.
निधन
[संपादन]भगवान दत्तात्रेय, त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद वल्लभ यांचे अवतार ज्या गुरू द्वादशीला-आश्विन वद्य द्वादशीला संपले, त्याच दिवशी वासुदेवराव गोविंद चोरघडे यांचे निधन झाले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ वासुदेव चोरघडे. Loksatta (Marathi भाषेत). 19-11-2018 रोजी पाहिले.
नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
(अपूर्ण)