विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि ज्ञानप्रबोधिनी,पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली. सदर कार्यशाळा मंगळवार दि.९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १२ ते ४ या वेळेत संपन्न झाली.

आयोजक[संपादन]

मराठी विकिसमूह

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  • मराठी विकिपीडियाची ओळख
  • खाते उघडणे
  • लेखांचा परिचय
  • लेखांमध्ये सुधारणा करणे
  • दुवे व संदर्भ देणे
  • चित्र/प्रतिमा जोडणे
  • साद देणे व सहाय्य मागणे

दिनांक,स्थान आणि वेळ[संपादन]

  • मंगळवार दि.९ ऑक्टोबर २०१८
  • वेळ-सकाळी १२ ते ४
  • स्थान- संत्रिका सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे

संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती[संपादन]

  • आर्या जोशी
  • पूजा जाधव
  • सुरेश खोले

स्वरूप[संपादन]

या कार्यशाळेत १३ सदस्य सहभागी झाले होते. यापैकी ११ महिला आणि २ पुरुष सदस्य होते. ग्रामीण विकास,शिक्षण,शालेय गटाचे पूरक शिक्षण करणा-या महिला कार्यकर्त्या, भाषांतरकार, विज्ञानआश्रम या संस्थेतील युवती असा मिश्र गट होता. आर्या जोशी, सुरेश खोले आणि पूजा जाधव यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सर्व सदस्य नवीनच असल्याने त्यांची खाती उघडण्यात आली. सदर अभियानाचा विषय हा शास्त्रीय अधिष्ठान असलेला असल्याने अगदीच नवीन सदस्यांनी त्यात भर घालणे काहीसे कठीण आहे असे जाणवले. मार्गदर्शक व्यक्तीनी या अभियानाच्या सूत्र विषयाच्या अनुषंगाने असलेल्या लेखात भर घालताना काय करावे,चांगल्या लेखांचे निकष, नवे लेख कसे करावे, wikimedia commons वर छायाचित्र घालणे व लेखात वापरणे, संदर्भ घालणे, इ गोष्टी सर्वाना शिकविल्या. यासाठी प्रकल्प पानावर नोंदविलेल्या लेखांचा आधार घेतला गेला.

या कार्यशाळेत प्रशिक्षणाचा भाग महत्वाचा होता कारण सर्वच संपादक पूर्णतः नवीन होते, त्यामुळे प्रत्यक्ष लेख संपादित करण्याविषयी यशस्विता साधता आली नाही, तरीही संपादक व्यक्ती यापुढील काळात या विषयावर काम करीत राहतील यासाठी आवाहन करण्यात आले आहे. साद देण्याचा पर्याय सर्वांना त्यासाठी दाखविण्यात आलेला आहे.

सदर पानावर नोंदविले गेलेले प्रशिक्षणाचे सर्व मुद्दे या कार्यशाळेत यशस्वीपणे शिकविण्यात आले आहेत.

सहभागी सदस्यांचा अभिप्राय[संपादन]

सर्व सहभागी सदस्यांनी कार्यशाळा उपयुक्त झाल्याचे नोंदविले आहे आणि त्यांना ती आवडल्याचे आवर्जून सांगितले आहे. या व्यासपीठावर आपण योगदान करू शकतो हे माहिती होते परंतु नेमके कसे करायचे हे समजल्याचे सदस्यांनी नोंदविले आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

महिला स्वास्थ्य या विषयावर गटाला मार्गदर्शन करायला आयुर्वेद वैद्या सौ. नीलिमा टिल्लू उपस्थित होत्या. महिलांचे शारीरिक स्वास्थ्य या विषयावरील लेख करताना महिलांच्या म्हणजे कन्येच्या जन्मापासून कुमारी अवस्था, कुमारी अवस्था ते पौगंडावस्था, मासिक पाळीचा काळ, त्यानंतर विवाह पूर्वकाळ, विवाह आणि लैंगिक स्वास्थ्य, गर्भधारणा आणि त्यासाठी आवश्यक पूरक आवश्यक परिस्थिती, गर्भधारणा होत नसल्यास त्याची कारणे आणि उपाय, गर्भधारणा आणि गर्भवतीने घ्यावयाची काळजी,आहार- विहार , प्रसूती, प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, मातेला दूध येणे, स्तनपान असे विविध लेख यामध्ये समाविष्ट करावेत.

बदलत्या काळात येणारे ताण मानसिक स्वास्थ्य बिघडवितात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी अनेकदा धूम्रपान, मद्यपान याचा आधार महिला घेतात. यासंबंधी जाणीव जागृती करणारे लेख असणे आवश्यक आहे.

चित्रदालन[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. सुधा रहाणे (चर्चा) १५:३६, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  2. उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १५:३०, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  3. अनिल पालकर (चर्चा) १६:१२, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  4. उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १५:२८, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  5. किरण राजापुरकर (चर्चा) १५:२४, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  6. उर्मिला बेटकर (चर्चा) १५:२०, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)उर्मिला बेटकर[reply]
  7. सोनाली जावळे (चर्चा) १५:२१, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  8. कल्याणी कोतकर (चर्चा) १५:२२, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  9. सुजाता प्रसाद बापट (चर्चा) १५:२२, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  10. आर्या जोशी (चर्चा) १५:२६, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  11. हेमलता कमलाक्ष राव (चर्चा) १५:३०, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  12. माधुरी करवडे (चर्चा) १५:२४, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  13. पवार सायली (चर्चा) १५:२६, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  14. कोमल संभुदास (चर्चा) १५:२९, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  15. गौरि विनीत् डोखले (चर्चा) १५:३०, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  16. Pooja Jadhav (चर्चा) १५:३३, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]