याज्ञवल्क्य स्मृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

याज्ञवल्क्य स्मृती हा एक हिंदू धर्मशास्त्रीय ग्रंथ आहे.[१]

काळ निर्धारण[संपादन]

इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाचा उत्तरार्ध या काळाच्या दरम्यान ह्या स्मृतीची रचना झाली असावी असे अभ्यासक मानतात.[२]

वैशिष्ट्य[संपादन]

मनुस्मृती या ग्रंथापेक्षा याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये याज्ञवल्क्य या धर्मशास्त्रकाराने तुलनेने अधिक नेमकी मांडणी केली असल्याचे अभ्यासक नोंदवतात. काळाच्या दृष्टीने ही स्मृती मनूनंतर निर्माण झाली असल्याने सामाजिक बदलांचे संदर्भ यात दिसून येतात. कायद्याच्या परिभाषेतील सुधारणाही या स्मृतीने नोंदविलेल्या दिसतात.[३] उदा. वारसा हक्कात विधवा स्त्रीला स्थान इत्यादी. तत्कालीन राजकीय, धार्मिक, सामाजिक व्यवस्थांमधे सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक नीति-नियम या स्मृतीमध्ये सांगितले गेले आहेत.[२]

याज्ञवल्क्य ऋषीसंबंधी मराठी पुस्तके[संपादन]

  • याज्ञवल्क्य (जनार्दन ओक)
  • याज्ञवल्क्य स्मृती अर्थात धर्मशास्त्र (डाॅ. इंदुभूषण बडे)

साहित्य संमेलन[संपादन]

'याज्ञवल्क्य वासंतिक साहित्य संमेलन' नावाचे नराठी साहित्य संमेलन एकदा पुण्यात भरले होते. त्याचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ V.D, Mahajan. Prachin Bharat Ka Itihas (Ancient India), Hindi Edition (हिंदी भाषेत). S. Chand Publishing. ISBN 9788121908795.
  2. ^ a b Sen, Sailendra Nath (1999). Ancient Indian History and Civilization (इंग्रजी भाषेत). New Age International. ISBN 9788122411980.
  3. ^ Jolly, Julius (1885). Outlines of an History of the Hindu Law of Partition, Inheritance, and Adoption, as Contained in the Original Sanskrit Treatises (इंग्रजी भाषेत). Thacker, Spink and Company.