आम्हीही इतिहास घडवला (पुस्तक)
आम्हीही इतिहास घडवला हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या दलित चळवळीत सहभागी झालेल्या स्त्रियांचा विस्तृत इतिहास मांडणारे पहिलेच पुस्तक आहे.[१] हे पुस्तक मराठीमध्ये उर्मिला पवार आणि मिनाक्षी मून यांनी १९८९ संपादित करून प्रकाशित केले व त्याचे इंग्रजी भाषांतर २००८ साली वंदना सोनाळकर यांनी केले.[२]
रचना
[संपादन]हे पुस्तक दोन भागांत विभागले गेलेले आहे, पहिल्या भागांत आंबेडकरी चळवळीत आणि वीसाव्या शतकातील त्या आधीच्या एकूणच चळवळीत स्त्रियांच्या सहभागाचे विश्लेषण आहे. दुसऱ्या भागांमध्ये एकूण ४५ दलित स्त्रीयांच्या मुलाखती आणि थोडक्यात आत्मकथने आहेत. ह्यांमध्ये आंबेडकरांच्या पहिल्या पत्नि रमाबाई आंबेडकर, १९४२ च्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट महिला परिषद, नागपूरच्या अध्यक्षा सुलोचनाबाई डोंगरे, १९५६ मध्ये अखिल भारतीय बुद्धिस्ट महिला असोसियेशनच्या अध्यक्षा राहिलेल्या सखुबाई मोहिते इत्यादी महिलांच्या मुलाखतींचा आणि आत्मकथनांचा समावेश आहे .
परिक्षणे
[संपादन]हे पुस्तक दलित आणि दलित स्त्रीवादी अभ्यासासाठी खजिना समजले जाते, कारण यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या पद्धतीचा वापर केला गेला असून, नुसत्या कोरड्या सिद्धांकनावर विश्लेषणाची भिस्त न ठेवता स्त्रीयांच्या जगण्यामधुन जटिल मुद्यांना समोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "We Also Made History". University of Chicago Press press.uchicago.edu. 17 June 2016 रोजी पाहिले.
- ^ Pawar, Urmila and Meenakshi Moon (2008). We Also Made History. Zubaan. pp. New Delhi. ISBN 9383074744.
- ^ Mangai, A. (30 December 2008). "Historic Feminist Struggle". The Hindu thehindu.com. 17 June 2016 रोजी पाहिले.