चर्चा:द्वारकानाथ कोटणीस
इतरत्र सापडलेला खालील मजकूर योग्य संदर्भ शोधून लेखात समाविष्ट करावा. - अभय नातू (चर्चा) २०:१४, १५ मार्च २०१८ (IST)
सोलापूरचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस
त्याग, निष्ठा, परंपरांनी पावन झालेल्या सोलापूरच्या भूमीत डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचा जन्म झाला. १० ऑक्टोबर १९१० रोजी लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या कर्मचारी निवासातील हा जन्म. गिरणीत कारकून म्हणून काम करणारे शांताराम कोटणीस यांनी आपल्या मुलाला डॉक्टर केले. द्वारकानाथ सुरुवातीपासूनच सेवाभावी होते. ‘रुग्ण सेवा हीच ईश सेवा ‘ हे ब्रीद घेऊन डॉ. कोटणीसांनी सोलापूरकरांची सेवा सुरु केली. याच दरम्यान, जुलै १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. त्याचे वृत्त संपूर्ण जगभर पसरले. त्यावेळी भारत आणि चीनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याकडे चीनने मदत मागितली. नेहरूंनी पाच डॉक्टरांचे पथक चीनला पाठवले. त्यामध्ये सोलापूरचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते.
चीनच्या रणभूमीवर डॉ. कोटणीसांनी सैनिकांची सुश्रुषा सुरु केली. इकडे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. वडिलांनी आत्महत्या केली. तरीदेखील विचलित न होता, त्यांनी चीनी सैनिकांची सेवा सुरूच ठेवली. घनघोर लढाईत जखमी झालेल्या हजारो सैनिकांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांचे हे कार्य चीन सरकार व जनता जवळून पाहत होती. युद्ध संपले, कोटणीस चीनमध्ये राहिले. ‘कोचीन्ग्लान’ या परीचारीकेशी विवाह केला. त्यांना एक अपत्य झाले, त्याचे नाव ‘यीन्हुआ’. यीन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन अशी त्या नावाची फोड करून आपल्या मित्रमंडळींना सांगत असत. त्यांनी चीनच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख म्हणून सेवा बजावली. परंतु अतिश्रम, दुषित हवामान यामुळे त्यांची प्रकृती बिखडली. त्यानंतर ९ डिंसेबरला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
डॉ. कोटणीस यांनी केलेल्या अपूर्व कार्यामुळे चीनी लोक त्यांना देवदूत मानतात. जगातील १० आंतरराष्ट्रीय व्यक्तीमध्ये चीनचा सच्चा मित्र म्हणून त्यांची गणना करण्यात आली. सोलापुरकरदेखील त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतात. सोलापूर महानगरपालिकेने त्यांचे निवासस्थान सुशोभित करून आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित केले आहे.