Jump to content

वाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाटी हा जेवणाच्या ताटात आमटी, पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा श्रीखंड, गुलाबजांब, रसगुल्ला आदी मिष्टान्ने वाढण्यासाठी वापरायचा एका विशिष्ट आकाराचा रुंद तोडाचा बुटका पेला असतो. वाटी बहुधा पितळेची, चांदीची किंवा स्टेनलेस स्टीलची असते. वाटीचा उपयोग रवा, साखर, किंवा अशाच प्रकारचे अन्य न शिजवलेले अन्नपदार्थ मोजून घेण्यासाठीही होतो.

पानात द्रव पदार्थ वाढण्यासाठी धातूच्या वाटीऐवजी पळसाच्या, सागाच्या अथवा तत्सम मोठ्या पानांपासून बनलेल्या द्रोणाचा वापर होतो.

मोठ्या आकारमानाच्या वाटीला वाडगा म्हणतात.