आंतरजातीय विवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरजातीय विवाह (इंग्रजी: Inter-caste marriage) हा एकाच धर्मातील परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय.

भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत मध्य प्रदेश मागे आहे तर गुजरात आणि बिहार आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.[१]

नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेच्या मनुष्यबळ विषयक सर्वेक्षणानुसार समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांतील १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या ५.४% महिलांचे लग्न परजातीच्या पुरुषाशी झाले आहे. २००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १% दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा गुजरात आणि बिहारात सर्वात जास्त म्हणजे ११% होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही.

संदर्भ[संपादन]