पॉल अ‍ॅलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉल गार्डनर ॲलन (२१ जानेवारी, १९५३:सिॲटल, वॉशिंग्टन, अमेरिका - ) हा अमेरिकेचा संगणकतज्ज्ञ आणि उद्योजक आहे. याने बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्याने अनेक कंपन्या सुरू केल्या आणि विकत घेतल्या. यात तंत्रज्ञान कंपन्या तसेच स्थावर मिळकत व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याने ॲलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स, इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्ट्रॅटोलॉंच सिस्टम्स या कंपन्या सुरू केल्या.

ॲलन एनएफएलच्या सिॲटल सीहॉक्स आणि एनबीएच्या पोर्टलॅंड ट्रेलब्लेझर्स या क्लबांचा मालक आहे. याशिवाय तो एमएलएसच्या सिॲटल साउंडर्स एफसी या क्लबचा अंशमालक आहे.

ॲलनच्या अनेक कंपन्या आणि धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याने व्हल्कन, इंक ही कंपनी स्थापन केलेली आहे.

जून २०१७मध्ये ॲलनची संपत्ती सुमारे २०.७ अब्ज अमेरिकन डॉलर होती. त्याद्वारे तो जगातील ४६व्या क्रमांकाचा धनाढ्य व्यक्ती होता.