जपानचा समुद्र
Appearance
जपानचा समुद्र हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र पूर्व आशियामध्ये आशियाची मुख्य भूमी, जपानचा द्वीपसमूह व रशियाचे साखालिन हे बेट ह्यांच्या मध्ये स्थित आहे. भूमध्य समुद्राप्रमाणे जवळजवळ पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे जपानच्या समुद्रामध्ये विशेष लाटा निर्माण होत नाहीत. तसेच येथील पाण्यामधील मिठाचे प्रमाण इतर समुद्रांपेक्षा कमी आहे.
कोरियन द्वीपकल्प व जपानला अलग करणारी कोरिया सामुद्रधुनी, जपानच्या होन्शू बेटाला होक्काइदोपासून वेगळे करणारी सुगारूची सामुद्रधुनी, होक्काइदोला साखालिन बेटापासून वेगळे करणारी ला पेरूज सामुद्रधुनी व साखालिनला मुख्य रशियापासून अलग करणारी तार्तर सामुद्रधुनी ह्या चार प्रमुख सामुद्रधुन्या जपानच्या समुद्राला इतर समुद्रांशी जोडतात.