काळा पैसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काळा पैसा या संज्ञेची अधिकृत व्याख्या जरी कोणत्याही भारतीय कायद्यात थेट केली गेली नसली तरी ज्या पैसांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कर भरलेला नसतो त्या पैसाला काळा पैसा असे संबोधले जाते. काळा पैसा म्हणजे अनधिकृत मार्गाने मिळवलेली संपत्ती होय.

सहसा ही संपत्ती भ्रष्टाचार, करबुडवणूक, बेकायदा व्यापार, इत्यादी मार्गांनी मिळवली जाते. मनि लाॅंडरिंग हे काळा पैसा पांढऱ्या पैशात बदलायचे तंत्र आहे.