राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र
Appearance
राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र ही भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या अंतर्गत असलेली संशोधन संस्था महाराष्ट्रातील राजगुरुनगर येथे १९९७ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते. संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांच्या नवनवीन जाती विकसित केल्या जातात, तसेच कांदा आणि लसूण बियाण्यांची विक्रीही केली जाते. येथील संशोधक नवीन उत्पादन तंत्रेही विकसित करत असतात.
येथे शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण यांच्या लागवडीबद्दलचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. काळूस येथे या संस्थेचे बियाणे तयार करण्यासाठीचे शेत आहे. शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांबद्दल मार्गदर्शन आणि कृषी सल्लाही दिला जातो. दर महिन्याला पीक सल्ल्याची मार्गदर्शिका जारी केली जाते.
संस्थेने विकसित केलेल्या कांद्याच्या जाती
[संपादन]- भीमा लाल
- भीमा शक्ती
- भीमा किरण
- भीमा सुपर
- भीमा शुभ्रा - पांढऱ्या कांद्याची जात
- भीमा सफेद
संस्थेने विकसित केलेल्या लसणाच्या जाती
[संपादन]- भीमा ओंकार
- भीमा पर्पल
संदर्भ सूची
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2017-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-05 रोजी पाहिले.