Jump to content

तमिळ मानिल काँग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तमिळ मानिल काँग्रेस हा भारतातील राजकीय पक्ष आहे. तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेल्या या पक्षाची स्थापना २९ मार्च, १९९६ रोजी झाली.

याचे पहिले अध्यक्ष जी.के. मूपनार होते. त्यांनी तमिळनाडूमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून निघालेल्या काही नेत्यांसह हा पक्ष रचला. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला ३९ जागा तर लोकसभा निवडणुकांमध्ये ११ जागा मिळाल्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त २,३०,७११ मते मिळाली व एकही मतदारसंघात विजय मिळाला नाही.