तमिळ मानिल काँग्रेस
Appearance
तमिळ मानिल काँग्रेस हा भारतातील राजकीय पक्ष आहे. तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेल्या या पक्षाची स्थापना २९ मार्च, १९९६ रोजी झाली.
- याचे पहिले अध्यक्ष जी.के. मूपनार होते. त्यांनी तमिळनाडूमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून निघालेल्या काही नेत्यांसह हा पक्ष रचला.
- त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला ३९ जागा तर लोकसभा निवडणुकांमध्ये ११ जागा मिळाल्या.
२०१६ च्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त २,३०,७११ मते मिळाली व एकही मतदारसंघात विजय मिळाला नाही.