Jump to content

ऐसान्येश्वर शिव मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऐशान्येश्वर शिव मंदिर हे तेराव्या शतकातील हिंदू मंदिर ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे आहे. []. हे मंदिर जुन्या भुवनेश्वर शहरातल्या श्रीराम नगर भागातील म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॉस्पिटलच्या आवारात आहे. हे देऊळ लिंगराज मंदिराच्या पश्चिम सीमेला असलेल्या भिंतीजवळ आहे. ह्या मंदिरात पूजा-अर्चा सुरू असून मंदिर पूर्वाभिमुख आहे.

मंदिरात योनिपीठातील शिवलिंग आहे.महाशिवरात्र, संक्रांत हे सण आणि जलाभिषेक,रुद्राभिषेक या पूजा येथे केल्या जातात. महाशिवरात्रीनंतर सहाव्या दिवशी येथे लिंगराज देवाची उत्सव मूर्ती आणली जाते.

इतिहास

[संपादन]

मंदिरातील सप्तरथासारखे स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य हे मेघेश्वर मंदिरासारखे आहे. त्यामुळे ऐशान्येश्वर मंदिर १३ व्या शतकात बांधले असावे, असे दिसते. इतर वैशिष्ट्यांवरून असे दिसते की हे गंगांनी बांधले आहे.

स्थापत्यशैली

[संपादन]

हे मंदिर कलिंग स्थापत्यशैलीत राखाडी वालुकाश्मात बांधले आहे. तल जंघा आणि वरील जंघा यांना अनुक्रमे खाखरा मुंडी आणि पीडा मुंडीने सजवले आहे. याच्या चौथऱ्यात तीन स्तर आहेत. ते खाखरा मुंडीने सजवले आहेत. अनुरथ पगमध्ये (मुख्य भाग ) सलग खाखरा मुंडीच्या शृंखला आहेत,अनुरथ पगामध्ये कमळ आणि कनिक पगामध्ये १० भूमी अम्ल आहेत. राहपगाच्या गंडीवर दोन उद्योत सिंह आहेत. गंडीच्या आधारावर समोरच्या भिंतीवर एक छोट्या आकाराचे रेखा अंगशिखर सुद्धा आहे.

दारांच्या चौकटींना बाहेरून आत पुष्प शाखा, पत्र शाखा आणि लता शाखा यांच्या तीन उभ्या पट्ट्यांनी सजवलेले आहे. चौकटींच्या खाली दोन कोपऱ्यात खाखरा मुंडी आहेत. भगवान ललाटबिम्ब गजलक्ष्मी ललितासनात बसलेले आहेत. चौकटीच्या बरोबर समोर वर प्रस्तरपादामध्ये एक नवग्रह पॅनेल आहे, प्रत्येक चौकटीत एक ग्रह आहे. सूर्याच्या हातात कमळ आणि केतूच्या हातात नागाची शेपटी आणि डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातात एक ढाल आहे. मंदिराची व्यवस्था भुवनेश्वर महानगरपालिका पाहते. योग्य देखभालीमुळे मंदिर चांगल्या स्थितीत आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ The forgotten monuments of Odisha. Volume 2. Kamalā Ratnam, India. Ministry of Information and Broadcasting. Publications Division, Indian National Trust for Art and Cultural Heritage