साचा चर्चा:भारतीय बौद्ध लेणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या साच्यामध्ये फक्त बौद्ध धर्माविषयीच्या लेखांचे दुवे दिसत आहेत. या साच्याचे पुनर्नामकरण भारतातील प्राचीन बौद्ध लेणी असे करावे.

अभय नातू (चर्चा) ०८:१०, २६ मे २०१७ (IST)[reply]

प्रायत: असे वाटले तरी तसे ते तसे नाहीये, उदा. बदामी लेणी ही हिंदु लेणी आहेत. त्यामुळे सर्व लेण्यांना बौद्ध म्हणणे योग्य नाही असे वाटते. निनाद १५:५८, २९ मे २०१७ (IST)[reply]
@Katyare:,
बरोबर आहे, परंतु साच्यातील (पिवळी) पट्टी पाहता असा गैरसमज होणे सहज शक्य आहे. ही पट्टी बदलावी का?
अभय नातू (चर्चा) २०:५४, ३० मे २०१७ (IST)[reply]
आपले म्हणणे उमजले.. भारतातील बहुतांश लेण्या ह्या पूर्वी बौद्ध लेण्या होत्या. भारतात बौद्ध धर्माचा -हास झाल्या नंतर तत्कालिन हिंदू राजवटीत त्यांचे हिंदूत्वीकरण होऊन अंशतः शिल्पात बदल केला गेला. कार्ला देवस्थान .. लेण्याद्री...विठोबाचे देऊळ..पांडवलेणी..व अलिकडे जैन लेणीचे स्वरूप दिलेले धाराशिव लेणी अशी अनेक उदाहरणे देता येतील. मराठी व इंग्रजी लेखातील लेण्याद्री गणपती लेख तुलनात्मक अभ्यासल्यास मराठी लेखात बौद्ध लेण्याबद्दल अतीशय त्रोटक माहिती व इंग्रजी लेखात विस्ताराने वस्तुनिष्ठ माहिती बघून मराठीत असे का व्हावे ?? याचे आश्चर्य वाटले नाही. उत्तर भारतात बौद्ध गया देवस्थान बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून सुरई ससई यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. बहुतांश लेण्या बौद्ध होत्या म्हणून कदाचित् https://en.wikipedia.org/wiki/Template:Indian_Buddhist_Caves या साच्याला तसे नाव इंग्रजी साच्यात स्पष्ट नाव दिलेले आहे. तसेच दुसरे म्हणजे अनेक लेण्या हिंदू व जैन धर्मीय आहेत. जसे की @Katyare: यांनी उल्लेखलेली बदामी लेणी.. वेरूळ लेणीतील त्रीसंगम परंतु तो समकालीन असेलच का ?? सांगता येत नाही. साच्यात टाकलेले बौद्ध शब्द हे बहुतांशी लेण्या ग्राह्य धरून माझ्याकडून टाकले गेलेले होते. ते @अभय नातू: आपल्या सूचने प्रमाने लवकरच बदलले अथवा काढले जातील.. प्रसाद साळवे ००:०५, ३१ मे २०१७ (IST)[reply]

पन्हाळेकाजी लेण्या या ही बौद्ध नाहीत. कृपया योग्य ते बदल करावेत.आर्या जोशी (चर्चा)

आर्या जोशी, तुम्ही चुकिचं सांगताय. पन्हाळेकाजी मध्ये ३० बौद्ध लेण्या आहेत. कृपया इंग्रजी लेख पहा.

भारतातील प्राचीन लेणी हा साचा पूर्णच्यापूर्ण Indian Buddhist Caves या इंग्रजी साचाचे भाषांतर आहे, म्हणून या मराठी साचाचे नाव भारतातील बौद्ध लेण्या किंवा भारतीय बौद्ध लेण्या (... लेणी नव्हे लेण्या - अनेकवचनी) असे असावे.

आणि या बौद्ध लेण्यात अनेक लेण्या हिंदू व जैन लेण्याही असू शकतात. आणि यात प्राचीन शब्द अनावश्यक आहे, कारण लेण्या प्राचीनच असतात.

--संदेश हिवाळेचर्चा १४:५८, १७ जुलै २०१७ (IST)[reply]

येथे लेणे हे एकवचन आहे आणि लेणी हे बहुवचन.
अभय नातू (चर्चा) २०:२४, १७ जुलै २०१७ (IST)[reply]

धन्यवाद, मी लेण्या चे लेणी करतो. --संदेश हिवाळेचर्चा २१:३२, १७ जुलै २०१७ (IST)[reply]