शिवसंकल्प सूक्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुक्ल यजुर्वेदाच्या (वाजसनेयी माध्यंदिन संहिता ) चौतिसाव्या अध्यायातील पहिले सहा मंत्र हे शिवसंकल्पसूक्त म्हणून ओळखले जातात.तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु | असे ध्रुवपद या सहाही मंत्रांच्या शेवटी आले आहे.या सूक्ताला उपनिषद म्हणूनही संबोधिले जाते.शिवसंकल्प हा या सूक्ताचा ऋषी असून मन ही त्याची देवता आहे.

....... अशा माझ्या मनात कल्याणाचे संकल्प येवोत अशी प्रार्थना येथे केलेली आहे. या प्रार्थनेमध्ये सूक्तकर्त्या ऋषीने  कल्याण असे म्हणत असताना नेमके काय अपेक्षित आहे असे मात्र स्पष्टपणे नोंदविलेले दिसत नाही. 

शिवसंकल्पसूक्तातील मनाचे वर्णन[संपादन]

मनुष्याचे मन जागेपणी दूर जाते,निद्रीतावस्थेत परत येते.ते सर्व इन्द्रियाना प्रकाशित करते. कर्मनिष्ठ ,बुद्धिमान विद्वान, प्रशांत मनाने आपापली यज्ञकर्मे  व्यवस्थित पार पाडतात.मन हे यज्ञ करण्यास समर्थ आहे. मन हे यज्ञ करण्यास समर्थ आहे.मन हे धैर्यरूप आहे. मनाखेरीज कोणतेही कार्य माणूस करू शकत नाही. या मनानेच वर्तमान,भूतकाळ आणि भविष्यकाळाचे ज्ञान होते. ते सोमयागाचा विस्तार करणारे आहे.मन सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात वास करते. मनाच्या अस्तित्वाशिवाय शरीरातील इन्द्रियाणा कोणतेही कार्य करता येत नाही.ज्याप्रमाणे रथाच्या चाकाचे सर्व आरे मध्यभागी असलेल्या नाभीत एकत्र येतात त्याप्रमाणे मनापासून केलेल्या अध्ययनाने ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद प्रतिष्ठित होतात.कुशल सारथी ज्याप्रमाणे घोड्याना नियंत्रित करतो त्याप्रमाणे मन माणसाला वाटेल तिथे नेते वा तिथून खेचून परतही आणते.अत्यंत नूतन वा वेगवान असे हे मन आहे. अशा माझ्या मनात कल्याणाचे संकल्प येवोत. ज्या शरीरात असे मन राहील त्या शरीराकडून धर्म्य आचार घडावेत. त्या ठिकाणी दुराचरणाची प्रेरणा होऊ नये.माझ्या मनात विश्वाच्या कल्याणाचा संकल्प कायम राहो. माझे मन ज्योतिर्मय आहे,प्रकाशमान आहे . मन अपूर्व आहे .अशा माझ्या मनात कल्याणदायी,शुभ,श्रेयस्कर असे श्रेष्ठ संकल्प येवोत. [१]

  1. ^ बापट धुंडीराज गणेश दीक्षित , शके १८६२,(१९४४), शुक्ल यजुर्वेद,(उत्तरार्ध), प्रकाशक- श्रीमंत राजेसाहेब, संस्थान औंध.