बुना, न्यू गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुना हे पापुआ न्यू गिनी देशाच्या ओरो प्रांतातील खेडे आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुना-गोनाची लढाई येथे लढली गेली.

१९४० च्या सुमारास बुना काही झोपड्यांचे गाव होते. दोस्त राष्ट्रांनी येथे विमानतळ उभारला होता. या विमानतळावर उतरलेले सैनिक कोकोडा वाटेवरून कोकोडा या लश्करी ठाण्यास कूच करीत. २१-२२ जुलै, १९४२ रोजी जपानी सैन्याने हल्ला करून हा विमानतळ व गाव जिंकले. २ जानेवारी, १९४३ रोजी अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैन्याने ते परत जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी येथून रबौल येथील जपानी तळावर विमानी हल्ले सुरू केले. जनरल डग्लस मॅकआर्थरने बुना येथे काही आठवडे तळ ठोकला होता.